कमी झालेल्या प्रवाशांमुळे बेस्ट भाडे कमी होणार!

  95

तीन किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्यांना होणार फायदा

मुंबई : बस भाडे कमी केल्यानंतर वाढणारा तोटा लक्षात घेता बेस्टने बसभाडे १०० टक्के वाढवले मात्र दिवसेंदिवस प्रवाशांमध्ये होणारी घट लक्षात घेता बेस्ट उपक्रम भाडे कमी करण्यासाठी विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे भाडे २ ते ३ रुपयांनी कमी करण्यासाठी तसेच मार्ग किलोमीटरचे नवी रचना करण्याचे काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेस्ट भाडेवाढीनंतर दैनंदिन प्रवाशांची संख्या सुमारे ४ लाख ५० हजारांनी कमी झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. नुकतीच बेस्ट अधिकाऱ्यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली जिथे कमी झालेल्या प्रवाशांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. विना वातानुकूलित बसेससाठी १ ते ३ किलोमीटरसाठी नवा टप्पा बनवण्यात येणार असून हे भाडे ७ ते ८ रुपयांपर्यंत कमी होईल "वातानुकूलित बसेससाठीही हाच मार्ग अवलंबला जाईल. कारण की १ ते २ किमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील ५ किमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांइतकेच भाडे द्यावे लागत आहे. तसेच सध्याच्या बेस्टच्या भाड्याची तुलना शेअर ऑटोरिक्षा व शेयर टॅक्सिची भाड्याशी करण्यात आली असून त्यांना स्पर्धात्मक बनवण्याची गरज असल्याचे आढळून आले आहे.

बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑटोरिक्षा शेअर करणाऱ्या प्रवाशांपेक्षा कमी पैसे द्यावे लागतील अशी ही रचना करण्यात येणार असून भाडे कमी करण्याचा हा फॉर्म्युला बेस्ट बनवणार आहे. यावर नवीन रचनेवर काम सुरू असून आवश्यक मंजुरीनंतर ते लागू करण्यात येईल. बेस्टच्या बस भाड्यात सहा वर्षांहून अधिक काळ वाढ करण्यात आली नव्हती आणि प्रत्यक्षात २०१९ मध्ये ते कमी करण्यात आले. बेस्टच्या बस भाड्यात अलिकडेच झालेल्या वाढीमुळे दरवर्षी ५९० कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. सध्या, विना - वातानुकूलित बसेससाठी १० रुपये आणि पहिल्या ५ किमी चालणाऱ्या वातानुकूलित बसेससाठी १२ रुपये भाडे आहे. २० किमी प्रवासानंतर प्रत्येक ५ किमीसाठी ५ रुपये वाढ होते आणि बसेस मुंबई जिल्ह्याच्या हद्दीतून गेल्यास स्थानिक कर म्हणून अतिरिक्त २ रुपये आकारले जातात.

Comments
Add Comment

Independence Day 2025: मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही