नेव्ही नगरमध्ये सुरक्षारक्षकाच्या हातावर तुरी देत अज्ञात व्यक्ती रायफल व काडतुसे घेऊन फरार !

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नौदलाच्या प्रवेशबंदी असलेल्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी एक मोठी घटना घडली. नौदलाच्या गणवेशात असलेली एक अज्ञात व्यक्ती नेव्ही नगरमधील निवासी भागात घुसला. आणि स्वत:ला पुढच्या शिफ्टसाठी आलेला गार्ड असल्याचे भासवून एका कनिष्ठ नौदल कर्मचाऱ्याकडून इन्सास रायफल व दोन मॅगझिनसह ४० जिवंत काडतुसे घेऊन फरार झाला .


हा व्यक्ती संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता ड्युटीवरील गार्डला भेटला आणि "तुला बदलण्यासाठी मला पाठवले आहे" असे सांगितले. गार्डने विश्वास ठेवून आपले शस्त्र त्याच्याकडे सुपूर्द केले. काही वेळाने घड्याळ विसरल्याचे लक्षात आल्याने तो गार्ड परत पोस्टवर आला , पण तोपर्यंत तो अज्ञात व्यक्ती तिथून फरार झाला होता .


त्यानंतर तीन तासांच्या शोधानंतरही काहीच सुराग न मिळाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. नौदल आणि कफ परेड पोलिसांनी यासंदर्भात तातडीने गुन्हा दाखल केला असून एनआयए आणि एटीएससह अनेक सुरक्षा यंत्रणा तपासात सहभागी झाल्या आहेत.


नौदलाकडून परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली, पण सध्या संशयिताचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, कर्मचाऱ्याने दिलेल्या वर्णनाच्या आधारे एक संशयिताचा स्केच तयार करण्यात आला आहे.


या घटनेमुळे लष्करी भागातील सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि