Ahmedabad Plane Crash : 'सुप्रभात आई...'अपघातापूर्वी केबिन क्रू मेंबर दीपक पाठकचा घरी अखेरचा फोन

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (१२ जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील २४१ प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या २४ जणांचा मृत्यू झाला. यावेळी विमानात १० केबिन क्रू मेंबर्ससह एकण २४२ प्रवासी होते. अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वाचला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला. तसेच विमान मेघानी परिसरात ज्या वसतीगृहाच्या इमारतीला धडकलं तेथील काही शिकाऊ डॉक्टरांचाही अपघातात जीव गेला. याच अपघातग्रस्त विमानात केबिन क्रू मेंबर असलेल्या बदलापूरच्या दीपक पाठकनेही जीव गमावलाय.



आईला शेवटचा फोन


काल विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी, सकाळीच तो आपल्या आईशी फोनवर बोलला होता. ‘गुड मॉर्निंग आई’ म्हणत त्याने तिच्याशी गप्पाही मारल्या, मात्र आपण आपल्या मुलाचा आवाज शेवटचा ऐकत आहोत, याची त्या माऊलीला जराही कल्पना नव्हती. विमान अपघातात दीपकचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या गावी शोककळा पसरली आहे, अपघाताची बातमी ऐकून त्याचे मित्र आणि कुटुंबियांनी तातडीने घरी धाव घेतली. सकाळीच दीपक त्याच्या आईशी फोनवर बोलला. मात्र त्यानंतर त्याचा घरच्यांशी काहीच संपर्क झाला नाही. दीपक पाठकच्या बहिणीने सांगितले की, सकाळीच तो त्याच्या आईशी शेवटचा बोलला, तिला गुड मॉर्निंगही म्हणाला. अपघाताची बातमी आल्यापासून त्याच्याबद्दल काहीच माहिती कळली नव्हती, असेही तिने सांगितलं.



कुटुंबाचा विश्वासच बसेना


विमान दुर्घटनेची बातमी समजल्यानंतर दीपकच्या कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधायचा खूप प्रयत्न केला, त्याचा फोन तर वाजत होता पण कोणीही फोन उचलला नाही, असे कुटुंबातील एकाने सांगितलं. जोपर्यंत तो फोन वाजत राहील, तोपर्यंत आम्ही या (त्याच्या मृत्यूच्या) वाईट बातमीवर विश्वास ठेवणार नाही, असेही ते म्हणाले.



११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये होता दीपक


दीपक पाठक हा बदलापूरचा रहिवासी होता, गेल्या ११ वर्षांपासून तो एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होता. काल सकाळी त्याने आईला फोन केला आणि गप्पा मारल्या, असं बहिणीने सांगितलं. आमच्या व्यस्त दिनचर्येमुळे आम्ही खूपदा बोलू शकत नसलो तरी, मी आणि माझी आई त्याच्याबद्दल नियमितपणे बोलतो, तो कुठे आहे, घरी आला का याची माहिती घेत असे, असेही त्यांनी नमूद केलं. पाठक कुटुंबात ५ भावंडे असून, दीपकचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तर मुंबईतील पवई येथील जल वायु विहार भागात असलेले विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या घरी शोकाकुल वातावरण आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी सभरवाल यांच्या पालकांची भेट घेतली.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या