Air India Plan Crash: सगळंच झालं खाक! पण ‘श्रीमद भगवद्गीता’ राहिली सुरक्षित

अहमदाबाद : अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघातात २४१ जणांनी प्राण गमावले असताना, या दुर्घटनेतील एक अत्यंत भावनिक क्षण समोर आला आहे. एअर इंडिया विमानाच्या जळून खाक झालेल्या अवशेषांमधून ‘श्रीमद भगवद्गीता’ ची प्रत सुरक्षित आणि अखंड अवस्थेत सापडली आहे.


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती श्रीमद भगवद्गीतेची पानं उलटताना दिसत आहे, अपघातात सर्व काही जळून राख झाले असताना भगवद्गीतेच्या प्रतीला त्याचा एकही दाह लागला नसल्याचे यामधून दिसून येते. या व्हिडिओने अनेकांच्या भावना उफाळून आल्या, याला अनेकांनी "दैवी चमत्कार" असे संबोधले आहे.


&

nbsp;

 

काल एअर इंडिया AI-171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचा झालेला दुर्दैवी अपघाताच्या बातमीने संपूर्ण देश हादरला आहे. हे प्रवासी विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर काही क्षणांतच ते बी. जे. मेडिकल कॉलेजजवळील रहिवासी परिसरावर कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. या अपघातात केवळ विश्वास कुमार रमेश नामक प्रवासी अगदी चमत्कारिक रित्या बचावले गेले, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला.


दरम्यान, नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी अपघात स्थळी तातडीने भेट दिली असून, विमान अपघात तपास संस्था (AAIB) कडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली असून, मृतांचे अवशेष ओळखण्यासाठी DNA तपासणी सुरू आहे. ही दुर्घटना केवळ मानवी हानीनेच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही संपूर्ण देशाला धक्का देणारी ठरली आहे. मात्र या भीषण घटनेत, भगवद्गीतेच्या प्रतीचे सुरक्षित सापडणे, एक आध्यात्मिक आशावाद निर्माण करून जाणारे आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर