Ahmedabad plane crash: दोन दिवस आधी झाले होते लग्न, विमान अपघातात पुसले गेले कुंकू

अहमदाबाद: वडोदरा शहराच्या वाडी परिसरात राहणाऱ्या महेश्वरी कुटुंबातील घरात दोन दिवस आधी लग्नाचा आनंद होता. कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे लग्न १० जूनला कोर्ट मॅरेजच्या मदतीने झाले होते. मात्र त्याच घरात आता दुखा:चे वातावरण आहे. लग्नाच्या दोन दिवसांतच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला.


भाविक महेश्वरी गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये काम करत होते. ते दरवर्षी १५ दिवसांसाठी वडोदरा येथे आपल्या कुटुंबियांना भेटायला येत असतं. या वेळेस ते आले तेव्हा घरच्यांनी लग्नाचा आग्रहच धरला. भाविक यांचा आधीच साखरपुडा झाला होता. कुटुंबाच्या संमतीने १० जूनला त्यांचे कोर्टात लग्न झाले.



दोन दिवसांतच लग्नाचा आनंद दु:खात बदलला


लग्नानंतर भाविक यांच्या पत्नीने त्यांना हसत हसत बाय केले होते. कोणी विचारही केला नव्हता की ही त्यांची शेवटची भेट असेल. फ्लाईटमध्ये गेल्या काही तासातंच ही बातमी आली की अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर विमान क्रॅश आले. यात भाविक प्रवास करत होते.


या बातमीने माहेश्वरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील अद्यापही आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे मान्य करण्यास तयार नाही. कुटुंबियांचे अश्रू थांबतच नाही आहेत. दोन दिवसांपूर्वी जिथे लग्नाची मिठाई वाटण्यात आली होती. तिथे आता भीषण शांतता आहे.



विमान अपघातात २५६ जणांचा मृत्यू


अहदमबादा येथून लंडनला जाणाऱ्या विमान अपघातात विमानच नव्हे तर अनेक कुटुंबियांची स्वप्ने, भविष्ये जळून खाक झाली. या दुर्घटनेत २६५ जणांचा जीव गेला. कोणी आपला मुलगा गमावला तर कोणी आई, वडील आणि पती तर कोणी आपली मुलगी. अनेकजण तर असे होते जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाले होते.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था