Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या लेकीचा मृत्यू!

  86

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी परिसरात काल दुपारी (१२ जून) एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यावेळी विमानात २४२ प्रवासी होते. या विमान दुर्घटनेमध्ये (Air India Plane Crash In Ahmedabad) एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातंच हे विमानत मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले. त्यामुळे मोठी जीवित हानि झाली असून अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. विमानामधये भारतीय प्रवाशांसह ब्रिटन, पोर्तुगीज आणि कॅनडाच्या नागरिकांचाही समावेश होता. तसेच ज्या इमारतीला धडकून हे विमान कोळसले त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाती अनेक विद्यार्थ्यांनीही जीव गमावला. विमानातील प्रवासी आणि वसतीगृहातील काही विद्यार्थी अशा एकूण २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शोक व्यक्त होत आहे.


दरम्यान, याच दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये राहणारी एका तरूणीचाही मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर असलेल्या २७ वर्षीय रोशनी सोनघरेने आपला जीव गमावला. ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. मात्र कालच्या भीषण अपघातामध्ये तिने अखेरचा श्वास घेतला.



रोशनीचं लहानपणापासूनच होते एअर क्रू बनण्याचं स्वप्न


मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत रोशनी सोनघरे राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते. मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले.



रोशनीचे लहानापासूनच एअर कृ बनायचं होतं. जिद्द आणि मेहनत करत तिने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं. काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे कालची रोशनीची भेट अखेरची ठरली. डोंबिवलीकर लेकीचा विमान अपघातात जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत असून तिच्या कुटुंबियांच्या शोकाला तर पारावर उरलेला नाही. सध्या तिच्या घराजवळ तिच्या नातेवाईक आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनीही तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना धीर दिला. रोशनीचा भाऊ आणि तिचे वडील हे अहमदाबादला निघाले असून तिची आई पूर्णपणे दुःखात बुडाली आहे.

Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या