‘कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करा’

प्रादेशिक रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी


कर्जत:कोरोना काळात कर्जत रेल्वे स्थानकावरील गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते ते पूर्ववत चालू करावे अशी मागणी प्रादेशिक रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत (झेडआरयूसीसी) सदस्य नितीन परमार यांनी केली. कोविडपूर्वी, कर्जत रेल्वे स्थानकावर मुंबई सीएसटीएमला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते, ते सर्व थांबे पूर्ववत करावे. पत्रासोबत ट्रेनची यादी दिली आहे. खालील ४ मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा विचार करावा आणि २ नवीन एक्सप्रेस गाड्यांना थांबे द्यावेत अशी मागणी बैठकीत केली.

कोयना एक्सप्रेस (११०३०) प्रगती एक्सप्रेस क्रॉसिंगमुळे कोयना एक्सप्रेस अनेकदा मुख्य मार्गावर उभी राहते. कोयना एक्सप्रेसला मुख्य मार्गाऐवजी कर्जत स्थानकावर थांबा दिल्यास प्रवाशांना सोयीचे होईल. मुख्य मार्गावर ट्रेन उभी असल्याने, लोकल ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी रुळांवर उतरू लागतात. त्यामुळे एखादा अनपेक्षित अपघात घडू शकतो.


कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस (११०५०) कोविड दरम्यान या ट्रेनचा फक्त कर्जत थांबा रद्द करण्यात आला होता, कोविडनंतर, ती सर्व थांब्यांवर थांबते, फक्त कर्जत येथे थांबा नाही. त्यामुळे कर्जत येथील थांबा पुन्हा सुरू करा. हैदराबाद मुंबई एक्सप्रेस (२२७३१) पुणे ते मुंबई प्रगती एक्सप्रेस त्यानंतर दुपारी ३.१५ वाजता डेक्कन एक्सप्रेस येते. या काळात कर्जत येथे कोणतीही एक्सप्रेस गाडी थांबत नाही. जर हैदराबाद एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल ते मुंबई एलटीटी (१२१६४) ला नियमित अंतराने कर्जत थांबा दिला तर कर्जत आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांसाठी ते सोयीचे होईल.

Comments
Add Comment

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

महाडमध्ये ५ गट आिण १० गणांसाठी २०३ मतदान केंद्र

१६ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत महाड वार्तापत्र संजय भुवड महाड : तालुक्यात ५ जिल्हा

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची