अहमदाबाद विमान अपघातावर पंतप्रधान मोदींची भावुक प्रतिक्रिया “अतिशय दु:खद घटना”!

गुजरात : गुजरातमधील अहमदाबाद येथे एक भीषण विमान अपघात घडला असून, या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. लंडनकडे जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत हे विमान कोसळले. विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यामध्ये भारतीय, ब्रिटिश, पोर्तुगीज आणि कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या प्रवाशांमध्ये २ नवजात बाळं आणि ११ लहान मुलं देखील होती.


हे विमान थेट एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले, ज्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले असून १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतरचे दृश्य अतिशय भयावह असून, विमानाचे अवशेष परिसरात विखुरलेले आहेत.


https://x.com/narendramodi/status/1933110947553681853

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर (X वर) प्रतिक्रिया देताना दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं, अहमदाबादमधील विमान अपघाताने मला मोठा धक्का बसला आहे. ही घटना अतिशय दु:खद आहे. माझ्या भावना या घटनेत प्रभावित झालेल्या सर्वांच्या सोबत आहेत. मी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.


घटनास्थळी NDRF (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल)च्या विविध टीम्स दाखल झाल्या असून ९० हून अधिक कर्मचारी मदतकार्य करत आहेत. बडोद्याहून आणखी एक टीम रवाना करण्यात आली आहे. सध्या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र या अपघातामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


ही दुर्घटना केवळ तांत्रिक चुकांपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण देशासाठी एक भावनिक हादरा ठरली आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना