पालघर जिल्ह्यातील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची चौकशी होणार

मुंबई : पालघर जिल्ह्यातील टायर पायरोलिसि रिसायकलींग कंपन्यांमधील तसेच इतर उद्योगांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सर्वेक्षण करावे आणि या संबंधीचा अहवाल एक महिन्यात द्यावा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.



पालघर जिल्ह्यातील रेड झोन परिसर वाडा तालुक्यातील टायर पायरोलिसिस रिसायकलींग कंपन्यामधील प्रदूषणाबाबत तसेच बोईसर औद्योगिक क्षेत्र व सातपाटी- मुरबे खाडीमधील रासायनिक प्रदूषण बाबत वन मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी नाईक बोलत होते. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, प्रधान वन संरक्षक  नरेश झिरमुरे, उपसचिव विवेक होशिंग, उदय ढगे आदी उपस्थित होते.


वन मंत्री नाईक म्हणाले की, आम्ही कोणत्याही उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र उद्योगांमुळे प्रदूषण होत असेल आणि ते कमी करण्यासाठी संबंधित कंपन्या उपाय योजना करत नसतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. पालघर जिल्ह्यातील वाडा, तारापूर व बोईसर या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात टायर रिसायकलिंग कंपन्या तसेच इतर औद्योगिक कारखाने आहेत. या कंपनीमध्ये सुरक्षा विषयक नियमांचे पालन होते का, वापरलेले पाण्याचे विल्हेवाट योग्य पद्धतीने होते का. प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडले जाते का या सर्वांची माहिती समितीने घ्यावी. तसेच या उद्योगांमुळे पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषण होते का याचाही अभ्यास करावा, असेही त्यांनी
यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील