शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी स्वरांगी घरात एकटी होती. स्वरांगीच्या घरातील सर्व सदस्य वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने बाहेर होते. एकटी असलेली स्वरांगी टेबल फॅन सुरू करुन वारा व्यवस्थित यावा यासाठी अॅडजस्ट करत होती. नेमक्या त्याचवेळी शॉक लागला आणि स्वरांगीचा मृत्यू झाला. टेबल फॅनची वायर शॉर्ट झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.

स्वरांगी धाऊलवल्ली येथील आनंदीबाई गोखले विद्यालयात शिकत होती. स्वरांगीच्या पश्चात मोठी बहीण आई वडील असा परिवार आहे.

शॉक लागून घरात एक मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला. घटनेची नोंद नाटे सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
Comments
Add Comment

ताम्हिणी घाटात थार अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू

पनवेल : ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-माणगाव

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

महाआघाडीत खळबळ; भाजपकडून ‘स्वबळा’ची भूमिका ?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटावर भाजपने स्वबळावर पुढे जाण्याचे संकेत पुन्हा स्पष्ट केल्यानंतर

माजी गृहमंत्र्यांचा मुलगा भाजपच्या वाटेवर ?

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळ ऑपरेशनल हे आहे विमानांचे वेळापत्रक एका क्लिकवर !

प्रतिनिधी:अखेर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उड्डाण घेणार आहे. पहिले विमान

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ