Sassoon Hospital : पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील मनोविकारतज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. नितीन अभिवंत यांचे हिमालयातील ट्रेकदरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे. बुरान व्हॅली (हिमाचल प्रदेश) येथे ट्रेकिंग करताना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


डॉ. अभिवंत हे केवळ ४२ वर्षांचे होते आणि त्यांना ट्रेकिंगची विशेष आवड होती. शनिवारी ते काही डॉक्टर मित्रांसह मुंबईहून बुरान व्हॅली ट्रेकसाठी रवाना झाले. सोमवारी सकाळी गिर्यारोहणास सुरुवात केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांना धाप लागली, घाम फुटला आणि श्वासोच्छवासात अडथळा जाणवू लागला.



त्याच वेळी उपस्थित असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी तातडीने प्रथमोपचार केले आणि जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह मित्र, सहकारी आणि नातेवाइकांमध्ये शोककळा पसरली आहे.


डॉ. नितीन अभिवंत हे २०१४ पासून ससून रुग्णालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्याआधी त्यांनी सोलापूरमध्ये पाच वर्षे सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. रुपाली अभिवंत (बी. जे. मेडिकल कॉलेजमधील PSM विभागात सहाय्यक प्राध्यापिका) आणि सात वर्षांचा मुलगा आहे.


या अकाली निधनाने एक अनुभवी आणि हसतमुख वैद्यकीय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सहकाऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग