विमान जुने होत असताना 'ड्रीमलाइनर'चा धोका भयानक असतो; व्हिसलब्लोअरच्या इशाऱ्याने सुरक्षेच्या वादाला पुन्हा उधाण

बोईंग विमानांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह!


नवी दिल्ली : मार्च महिन्यात ६२ व्या वर्षी मृत्यू पावलेले जॉन बार्नेट हे बोईंग कंपनीचे माजी क्वालिटी कंट्रोल मॅनेजर होते. त्यांनी अनेक वर्षांपासून या विमान निर्मिती कंपनीवर अमेरिकेच्या कायद्यांचे "अनेक वेळा उल्लंघन" केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रमाणात हे विमान जुने होत जाते, त्याच प्रमाणात त्याच्या कार्यक्षमतेवरील धोके भयानक स्वरूप धारण करू शकतात.


ड्रीमलाइनर मॉडेल तयार करणाऱ्या बोईंगच्या उत्तर कॅरोलिनामधील फॅक्टरीतील कामावर बार्नेट यांनी गंभीर सवाल उपस्थित केले होते. त्यांच्यानुसार, कंपनीने क्वालिटी तपासणी टाळण्याचा प्रयत्न केला होता. एक चुकीचा भाग, ऑक्सिजन सिस्टममध्ये बसवण्यात आलेली संभाव्य दूषित ट्यूब, मूळतः स्क्रॅप बिनमध्ये टाकण्यात आली होती. पण नंतर तीच ट्यूब प्रत्यक्षात वापरल्या गेलेल्या विमानात बसवण्यात आली, असा बार्नेट यांचा दावा होता. जर ती ट्यूब योग्यरित्या सॅनिटाइझ केली नसेल, तर ती स्फोट घडवून आणू शकते आणि संपूर्ण विमान कोसळण्याचा धोका निर्माण करू शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला होता.





एका वेगळ्या तक्रारीत इंजिनीयर सालेहपूर यांनी सांगितले की, ड्रीमलाइनरच्या वेगवेगळ्या भागांमधील सूक्ष्म फटी नीट भरल्या गेल्या नाहीत. तर यामुळे विमान अधिक लवकर झिजते आणि त्याचे आयुष्य कमी होते. परिणामी, "भीषण तांत्रिक अपयश" होण्याचा धोका वाढतो.


बोईंगने मात्र सर्व आरोप फेटाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बार्नेट यांनी २०१७ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी मांडलेले मुद्दे कंपनीने हाताळले होते. तांत्रिक तपासणीनंतर स्पष्ट करण्यात आले की, त्यांचे आरोप विमानाच्या सुरक्षेला धोका पोहोचवत नाहीत.


२०११ पासून सेवेत असलेले ७८७ ड्रीमलाइनर विमान ५० वर्षांपर्यंत उड्डाण करू शकते, असेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, गुरुवारी अहमदाबादमध्ये घडलेल्या अपघातानंतर कंपनीने एक छोटं निवेदन दिलेआहे की, “आम्हाला प्राथमिक अहवालांची माहिती आहे आणि आम्ही तपशील गोळा करत आहोत.” यापुढे कोणतीही अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.



हवेत उडत असलेल्या एअर इंडियाच्या २४२ प्रवाशांनी भरलेल्या विमानाला टेकऑफनंतर थोड्याच वेळात अपघात झाला. विमान हवेत चढताना थरथरतं होतं, अचानक दिसेनासं झालं आणि काही क्षणांत भस्मसात झालं, असे भयभीत करणारे व्हिडीओ समोर आले आहेत.


या दुर्घटनेनं केवळ देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेषतः बोईंगच्या '७३७ मॅक्स' दुर्घटनांनंतर कंपनीवर विश्वासाचे ढग गडद होत चालले आहेत.


२०१८ आणि २०१९ मधील अपघातांत ३४६ लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर अमेरिकेच्या न्याय विभागाशी कंपनीने एक करार केला. गुन्हेगारी खटल्यांपासून वाचण्यासाठी दंड भरणे, सुरक्षा गुंतवणूक वाढवणे आणि पीडितांच्या कुटुंबांना मदत करणे, अशा अटी त्यात समाविष्ट होत्या.


एप्रिल २०२४ मध्ये एक नवीन आरोप समोर आला की, ड्रीमलाइनरच्या विमानाचे काही भाग नीटपणे जोडले गेले नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे दीर्घकाळ वापरानंतर विमान हवेतच तुटू शकते. यावर कंपनीने उत्तर दिलं की, त्यांनी आवश्यक चाचण्या घेतल्या असून सध्या कोणताही तात्काळ धोका नाही.


तरीही, हे सर्व आरोप आणि सतत घडणाऱ्या घटना पाहता, बोईंगच्या सुरक्षिततेविषयी जागतिक स्तरावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेच्या अपयशासाठी इराणने अमेरिकेला धरले जबाबदार

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील निष्फळ झालेल्या चर्चेनंतर, इराणने म्हटले आहे की, वाटाघाटी अजून संपलेल्या नाहीत.

Iran-US Peace Treaty : ४० दिवसांच्या संघर्षाची २१ तास चाललेली चर्चा निष्फळ; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली बहुचर्चित शांती चर्चा अखेर

Iran-US Peace Treaty : अमेरिका-इराणचे शिष्टमंडळ दाखल, इराणच्या चार प्रमुख मागण्या

शस्त्रसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन

Chimpanzees Civil War : सातासमुद्रापार सेंट्रल, वेस्टर्नचा संघर्ष पेटला, एकेकाळी मित्र असलेले घेतायत एकमेकांचा जीव

कंपाला : एकेकाळी एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं राहणारे चिम्पांजी एकेमकांच्या जीवावर उठल्याचा प्रकार घडला आहे.

Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेपूर्वी तणाव शिगेला! अमेरिकेच्या 'त्या' कृतीची आठवण करून देत इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल

अमेरिकेसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या शांतता चर्चेसाठी इराणचे ७१ सदस्यीय शिष्टमंडळ शुक्रवारी (१० एप्रिल) उशिरा