Astrology:१५ जूनला सूर्य-गुरूची युती, या ५ राशींना अचानक होऊ शकतो धनलाभ

मुंबई: १५ जूनला सूर्य देवता मिथुन राशीत प्रवेश करत आहे. या राशीमध्ये गुरू आधीपासूनच विराजमान आहे. मिथुन राशीमध्ये सूर्य-गुरूच्या युतीमुळे गुरू आदित्य राजयोग निर्माण होईल. गुरू हा सूर्याचा मित्र ग्रह मानला जातो.


ज्योतिषशास्त्रात गुरू आदित्य योग अतिशय शुभ मानला जातो. असे म्हणतात की हा योग व्यक्तीच्या जीवनात ज्ञान, धन, यश, मान-सन्मान आणि सुख-समृद्धी घेऊन येतो.


सूर्य गुरू ग्रहाच्या युतीमुळे अनेक राशींना लाभ होणार आहे तसेच काही राशींच्या जीवनात आनंदीआनंद येणार आहे.



वृषभ


गुरू आदित्य योगमुळे वृषभ राशीच्या लोकांना शुभ समाचार मिळेल. आर्थिक कामांमध्ये प्रगती होईल. पगार वाढण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरूवात करू शकाल.



सिंह


गुरू आदित्य योगामुळे सिंह राशीच्या लोकांचे प्रगतीचे मार्ग खुले होतील. या शुभ योगामुळे लाभ होतील. धनलाभाचे चांगले योग बनत आहेत. नशिबाची संपूर्ण साथ मिळेल.



कन्या


या शुभ योगामुळे कन्या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढेल. अडकलेले पैसे प्राप्त होतील. ज्यांना नोकरी मिळत नाही आहे त्यांना चांगला जॉब मिळेल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल.



कुंभ


कुंभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. मान-सन्मान वाढेल. आरोग्य चांगले राहील. मित्र परिवार आणि नातेवाईकांची साथ लाभेल. वारसा संपत्तीचा लाभ होईल. धन खर्च वाढेल.



मीन


मीन राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात आवड वाढेल. नोकरी-व्यापारात मोठा फायदा होईल. मुलांसाठीही हा काळ चांगला आहे. एखादी खुशखबर मिळेल. नशिबाची संपूर्ण साथ लाभेल.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण