Air India Plane Crashed : मोठी बातमी! एअर इंडियाचं AI 171 विमान कोसळलं; मदतकार्य सुरु

  122

AI 171 विमान उड्डाण करताना कोसळलं


अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधून मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमादाबा5दमध्ये एअर इंडियाचं AI 171 प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये फक्त धुराचे लोट दिसत आहेत. धुराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.



विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते. अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे विमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचं म्हंटल जातंय. हे विमान अहमदाबादवरुन लंडनच्या दिशेने जात होतं.




रहिवासी भागात कोसळलं विमान


अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळलं आहे. ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या भागात रहिवासी वस्ती आहे. जिथे अपघात झाला, त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल  करण्यात आलंय.



युद्धपातळीवर बचावकार्य, आग विझविण्याचे प्रयत्न


या भागात अग्निशमन दलाच्या एकूण सात गाड्या दाखल झाल्या आहेत. टेक ऑफच्या अवघ्या १० मिनिटांत हे विमान कोसळल्यानंतर आता काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. विमानाला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गांधीनगरहून विमान अपघातस्थळी ९० कर्मचाऱ्यांसह तीन NDRF पथके हलवण्यात आली आहेत. वडोदराहून आणखी तीन पथके हलवण्यात येत आहेत.



विमानात होते १६९ भारतीय


अहमदाबाहून लंडनला जात असलेले एअर इंडियाचे AI 171 हे विमान उड्डाण केल्यानतर थोड्याच वेळात कोसळले. या विमान दोन वैमानिक, दहा क्रू आणि २३० प्रवासी असे एकूण २४२ जण होते. या २४२ पैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन, ७ पोर्तुगीज नागरिक असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. एअर इंडियाने प्रवाशांच्या नातलगांच्या सोयीसाठी १८०० ५६९१ ४४४ (1800 5691 444) हा हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केला आहे.
Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या