Air Indiaकडून प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी विशेष मदत उड्डाणांची व्यवस्था

  61

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये Air India च्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर, Air India ने प्रवाशांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष मदत उड्डाणांची घोषणा केली आहे. या विशेष फ्लाइट्स दिल्लीतून आणि मुंबईहून थेट अहमदाबादसाठी रवाना होणार आहेत.


या विशेष उड्डाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे:


दिल्लीहून अहमदाबादसाठी – फ्लाइट क्रमांक IX1555
वेळ: १२ जून, रात्री ११:०० वाजता


अहमदाबादहून दिल्लीसाठी – फ्लाइट क्रमांक IX1556
वेळ: १३ जून, रात्री १:१० वाजता


मुंबईहून अहमदाबादसाठी – फ्लाइट क्रमांक AI1402
वेळ: १२ जून, रात्री ११:०० वाजता


अहमदाबादहून मुंबईसाठी – फ्लाइट क्रमांक AI1409
वेळ: १३ जून, रात्री १:१५ वाजता


हे उड्डाण फक्त प्रवाशांचे नातेवाईक आणि Air India च्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहेत, जे आपल्या प्रियजनांच्या मदतीसाठी किंवा माहिती घेण्यासाठी अहमदाबादला जाण्याचा प्रयत्न करत आहेत.


Air India ने दिल्लीत व मुंबईत असणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.


१८०० ५६९१ ४४४ - भारतातील कॉलसाठी (विशेषतः दिल्ली व मुंबईमधील लोकांसाठी)
+९१ ८०६२७७९२०० - आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी


या विशेष फ्लाइट्समुळे अपघातग्रस्त प्रवाशांचे कुटुंबीय लवकरात लवकर अहमदाबादला पोहोचू शकतील आणि आपल्या नातेवाईकांची स्थिती जाणून घेऊ शकतील. या संकटकाळात Air India कडून ही एक महत्त्वाची आणि संवेदनशील पावले उचलण्यात आली आहेत.


या भीषण घटनेनंतर अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर Air India कडून सुरू करण्यात आलेल्या मदतीच्या प्रयत्नांमुळे प्रभावित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या