घणसोलीच्या गवळीदेव परिसरात पर्यटनाला बंदी

विकासकामांमुळे प्रशासनाचा निर्णय; पर्यटकांमध्ये नाराजी


वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने गवळीदेव परिसराचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे गवळीदेव परिसरात पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.



फेसाळलेला धबधबा, हिरवाईने नटलेला डोंगर असे वर्णन गवळीदेव परिसराचे केले जाते. घणसोली शहराच्या पूर्व सीमेवर कल्याण आणि नवी मुंबईच्या मध्यभागी ‘घणसोलीचा वॉटरफॉल’ म्हणजेच ‘गवळीदेव धबधबा’ पर्यटनस्थळ मागील अनेक वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. गवळीदेव धबधब्याला येथील नागरिक ‘घणसोली टेकडी’ही म्हणतात. एका बाजूला औद्योगिक परिसर असल्याने या ठिकाणी धबधबा असेल, असे कुणाला वाटणारही नाही; मात्र हा डोंगर जसजसे आपण वर चढत जातो, तसतशी येथील निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनराईचे दर्शन होत जाते. काहीसा डोंगर चढल्यानंतर समोर दिसतो तो उंच कड्यावरून कोसळणारा फेसाळलेला धबधबा. या धबधब्यावर येण्याची सर्वोत्तम वेळ पावसाळ्यात असते. अन्यथा, इतर ऋतुमध्ये हा धबधबा एक शांत टेकडी म्हणून ओळखली जाते. हिवाळा आणि उन्हाळ्यात सभोवतालचे जंगल क्षेत्र फिरता येऊ शकते.


गवळीदेव पर्यटनस्थळाचा विकास अनेक वर्षांपासून रखडला होता. अखेर वनविभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. पालिकेने या आधी गवळीदेव पर्यटनस्थळाच्या ठिकाणी प्रवेशद्वार, दीपस्तंभ उभे केले आहे; मात्र आता पालिकेकडून गवळीदेव पर्यटनस्थळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे, पाण्याची व्यवस्था, डोंगर कड्यांना संरक्षण कठडे, डोंगर माथ्यावर चढण्यासाठी आकर्षक पायऱ्या, विहिरी, तलावांची स्वच्छता, पर्यटन विश्रांती कक्ष, थकलेल्या पर्यटकांसाठी आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी बसण्याची व्यवस्था, पक्षीप्रेमींसाठी माहिती फलक, पथदिवे, कचराकुंडी, ठिकठिकाणी देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. या ठिकाणी पालिकेकडून ही कामे प्रगतिपथावर सुरू आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबईत घरगुती ट्युशन क्लासचा स्लॅब कोसळला, एका मुलाचा मृत्यू आणि १० मुले जखमी

कोपरखैरणे : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर दोनमधील प्लॉट क्रमांक १२ येथे विद्याभवन अपार्टमेंटमधील

“धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही”

खारघर : “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे

सिडकोच्या ‘माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये’ योजनेला मुदतवाढ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

नवी मुंबई : सिडकोतर्फे राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ घरांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी

Navi Mumbai International Airport : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबची पायाभरणी

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवार १८ फेब्रुवारी रोजी पूर्णपणे स्वयंचलित एअर कार्गो हब

आधी हत्या आणि मग मृतदेहासोबत अनेक किलोमीटरचा प्रवास; हवालदाराने केले असे काही....

नवी मुंबई : नवी मुंबईतील एका धक्कादायक घटनेने सामान्य नागरिक आणि चक्क पोलिसही चक्रावून गेले आहेत. एका हवालदाराने

धावत्या लोकलमधून प्रवाशाने वाशीच्या खाडीत मारली उडी

वाशी : धावत्या लोकलमधून प्रवाशाने वाशीच्या खाडीत उडी मारली. ही धक्कादायक घटना नवी मुंबईतील वाशी खाडी परिसरात