विंधन विहिरींच्या कामाची ‘डेडलाईन’ वीस दिवसांवर!

  26

दोन महिन्यांत निम्म्या विहिरींची कामे पूर्ण


पालघर : पालघर जिल्ह्यामधील विविध गाव पाड्यांमधील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात ४०४ विंधन विहिरींची कामे मंजूर आहेत. मात्र यापैकी निम्मे म्हणजेच २०० कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ३० जूनपर्यंत सर्व विंधन विहिरींची कामे पूर्ण करावी लागणार असल्याने २० दिवसांत राहिलेली कामे पूर्ण होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन विंधन विहीर बांधणे, विंधन विहिरींची दुरुस्ती, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना तयार करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अशा उपाययोजनांचा समावेश कृती आराखड्यामध्ये करण्यात आला आहे.


पाणीपुरवठा कृती आराखड्यात प्रस्तावित ४४२ विंधन विहिरींपैकी ३४९ विंधन विहिरींच्या खोदकामास तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी मंजुरी दिली होती. तर ९३ विंधन विहिरीची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्या अपात्र करण्यात आल्या होत्या. अपात्र करण्यात आलेल्या विंधन विहिरींपैकी मोखाडा तालुक्यातील ५३ आणि वाडा तालुक्यातील २ विंधन विहिरींचे कागदपत्र नव्याने सादर करण्यात आले.


त्यानुसार पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी मोखाडा तालुक्यातील ५३ आणि वाडा तालुक्यातील दोन अशा एकूण ५५ विंधन विहिरींच्या कामास ९ एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे.


दरम्यान, ९ एप्रिल ते ९ जून या दोन महिन्यांच्या कालावधीत २०० विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत तर २०४ कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. विशेष म्हणजे पाणीटंचाई उपायोजनांची कामे २०२४-२५ यावर्षीच्या कालावधीत पूर्ण होऊन याच वर्षी उपयोगात येतील या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. विंधन विहिरीचा उपयोग ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठीच करावा अन्यथा विंधन विहीर घेण्यात येऊ नये यासोबतच ही कामे कोणत्याही परिस्थितीत ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी दिले आहेत. मात्र ९ जून पर्यंत २०० विंधनविहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता २० दिवसांमध्ये विंधन विहिरींची कामे पूर्ण होणार कशी याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.



पैसे उशिराने मिळत असल्याने निरुत्साह


यावर्षी केलेल्या पाणीटंचाईच्या कामाचे देयक पुढच्या वर्षी मिळते. त्यामुळे पाणीटंचाईची कामे करण्यास कंत्राटदार सहज तयार होत नाहीत. शासनाच्या शेकडो योजनांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या जातो. मात्र अत्यंत आवश्यक असलेल्या पाणीटंचाईच्या कामासाठी वेळेवर निधी दिला जात नाही. त्याचा परिणाम पाणीटंचाईच्या कामावर होतो. करिता या संदर्भात शासनाने पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरत आहे.



तालुका मंजूर विंधन विहीर



  • पालघर      ४७

  • वसई          १३

  • तलासरी     २५

  • वाडा          १११

  • जव्हार        ६०

  • मोखाडा      ५३

  • डहाणू         ४१

  • विक्रमगड    ५४

Comments
Add Comment

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

न्यू इंग्लिश स्कूल सोनाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

वाडा : वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या दि.

४०० खाटांच्या हॉस्पिटलसाठी सातबाऱ्याचा अडसर!

२५ कोटींचा निधी डीपीसीकडे पडून विरार : नालासोपारा मौजे आचोळे, येथे प्रस्तावित असलेल्या ४०० खाटांच्या

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात

खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि