गायिका सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना साद

मुंबई : वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं तसं अवघडच. जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांची साथ, पाठिंबा महत्त्वाचा असतो याची जाणीव मुलींना नक्कीच असते. या सुंदर नात्यावर आधारलेलं एक गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे. आगामी ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील हे गीत गायिका सुनिधी चौहान हिने गायलंय.

का रे बाबा … का रे पप्पा
कुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा....
तू सांग ना तू सांग ना
तू सांग ना.... हा माझ्या बाबा

असे बोल असलेलं हे गीत अरविंद भोसले यांनी लिहिलं असून श्रेयस देशपांडे यांचे संगीत गीताला लाभले आहेत. बाप लेकीचे भावनिक नाते उलगडणारं ‘अवकारीका’ चित्रपटामधील ह्रदयस्पर्शी गाणं 'आपल्या आयुष्यात असलेले वडिलांचे स्थान आणि त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट या सर्वांची जाणीव करुन देते. येणाऱ्या 'फादर्स डे' च्या निमित्ताने हे गीत वडील मुलीच्या नात्यासाठी सुंदर भेट ठरेल. हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांच्या अंतर्मनाचा ठाव हे गाणं घेईल, असा विश्वास गायिका सुनिधी चौहान यांनी व्यक्त केला.

रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला भेटीला येणाऱ्या ‘अवकारीका’ चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये