मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. मात्र, आता (दि.१३) जूनपासून पुन्हा एकदा राज्यात मान्सूनचे जोरदार कमबॅक होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून, राज्यातील एकूण १३ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे असून, मुसळधार पाऊस बरसण्याचे भाकीत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे राज्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.तसेच शेतीपिकांनाही मोठा फटका बसला होता.


त्यानंतर आता जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे. साधारणपणे राज्यात १५ जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. मात्र, यावेळी मान्सून लवकर दाखल झाला होता. त्यामुळे पाऊस लवकर सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



'या' जिल्ह्यांना अलर्ट


यलो अलर्ट – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई आणि ठाणे


ऑरेंज अलर्ट – पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

Comments
Add Comment

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर