Stock Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टीत तुलनेने वाढ सेन्सेक्स १२३.४२ व निफ्टी ३७.१५ अंकाने वधारला !

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ वाढ झाली आहे.सेन्सेक्स (Sensex) मध्ये १२३.४२ अंशाने वाढत निर्देशांक ८२५१५.१४ पातळीवर पोहोचला आहे. तर निफ्टी ५० निर्देशांकात ३७.१५ अंशाने वाढ होत निर्देशांक २५१४१.४० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र २३६.०३ अंशाने घसरण झाल्याने बँक सेन्सेक्स ६३६७३.७१ पातळीवर तर बँक निफ्टी निर्देशांकातही १६९.३५ अंशाने घसरण होत निर्देशांक ५६४५९.७५ पातळीवर पोहोचला आहे.


आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये निफ्टी मिडस्मॉलकॅप हेल्थकेअर (०.५९%),तेल व गॅस (१.४७%),फार्मा (०.५०%),आयटी (१.२६%) या समभागात वाढ झाली आहे.घसरण मिडस्मॉलकॅप फायनांशियल सर्विसेस (१.०४%),एफएमसीजी (FMCG)(०.६७%),खाजगी बँक (०.२६%) समभागात अधिक घसरण झाली आहे.


आज बीएसई (BSE) मध्ये ४१८० समभागापैकी २२४७ समभाग तेजीत राहिले तर १८१६ समभागात घसरण झाली आहे.एनएसई २९९५ पैकी १६०८ समभाग तेजीत तर १३०४ समभागात घसरण झाली आहे.आज बीएसईचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४५५ लाख कोटी होते तर एनएसईचे बाजार भांडवल ४५३.४५ लाख कोटी होते.दुपारी २ वाजेपर्यंत सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात वाढला होता.मात्र अमेरिकन बाजार सुरू होण्यापूर्वी व सत्राच्या अखेर बाजारात उत्साह ओसरला गेला होता.पीएसयु तेल व गॅस कंपन्यांच्या समभागात वाढ झाल्याने ही रॅली झाली होती परंतु बँक निर्देशांकात घसरण झाल्याने एकूण बाजार निर्देशांकात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या बाबतीत स्थिरता प्रस्थापित होत असल्याने एकूणच भावना गुंतवणूकदारांना तेल व गॅस समभागांकडे आकर्षित करून गेल्या.


नवी दिल्लीतही युएस -भारत यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे वृत्त होते.याशिवाय अमेरिका चीनचे व्यापाराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याने सकारात्मकता कायम होती.मात्र अंतिम निष्कर्ष मिळालेले नसल्याने अजूनही बाजारात अपेक्षित रॅली मिळू शकली नाही.ट्रम्प यांच्या टेरिफचा मार्ग मोकळा झाला असताना सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली.याशिवाय वर्ल्ड बँकेच्या नव्या अहवालात जून २०२५ पर्यंत आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ६.५ टक्के वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.तर आर्थिक वर्ष २०२८ मध्ये ६.७% वाढ अपेक्षित आहे. मात्र यावर्षी विविध जागतिक संकटामुळे केवळ २.३% वाढ अपेक्षित आहे.


आज सत्राअखेरीस सर्वाधिक वाढ ऑइल इंडिया (६.४६%),टाटा टेलिकॉम (६.३९%),प्रीजम जॉन्सन (६.२६%),क्रिसील (५.९५%),सन्मान कॅपिटल (३.२९%),भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (४.३०%),एचसीएलटेक टेक्नॉलॉजी (३.२३%),जेल इंडिया (२.२६%),एलआयसी (१.८३%),वेदांता (१.६८%)या समभागात वाढ झाली आहे तर नुकसान इंडियन एनर्जी (७.७२%),युनायटेड स्पिरीट (६.६३%),इंजिनियर्स इंडिया (५.१९%),ज्योती सीएनसी (४.३५%), गार्डन रिच (४.१५%), श्रीराम फायनान्स (२.०५%), जिंदाल स्टील (१.९२%), पॉवर ग्रीड (१.८६%), आयसीआयसीआय लोमबार्ड (१.८१%), चोलामंडलम फायनान्स (१.८१%), बँक ऑफ बडोदा (१.७६%), स्विगी (१.५३%),अदानी पॉवर (१.५१%) या समभागात घसरण झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले,'आजचा बाजार पहाता हळूहळू तेजीकडेच कल जाताना दिसत आहे कालची २३०० कोटींची विदेशी गुंतवणूकदारांकडून केलेली खरेदी हे संकेत देत आहेत.मागील सात आठ महीने चाललेली विदेशी संस्थांमार्फत सततची विक्री ही आपल्याच म्युचल फंडांनी खरेदी करत बाजारातील मोठी मंदी सहजपणे टाळली आहे.आता परिस्थितीत अशी निर्माण होऊ शकेल कि एखाद्या शेअरला म्युचल फंड आणि विदेशी संस्था यांमधे खरेदीसाठी चढाओढ दिसू शकेल. आर्थिक पातळीवर भारत निश्चितच फास्ट ग्रोईंग अर्थव्यवस्थेचा टॅग कायम ठेवत ६.५ ते ७ % जीडीपी कायम राखत प्रगती कायम करीत आहे. डिफेन्सची विमानांच्या इंजिनाचा विषय मार्गी लागला तर भारताचा विकास दर खूप वेगाने वाढेल.आजही बॅका व मनी मार्केट तसेच एनबीएफसीचा (NBFC)खरेदी जोर दिसत आहे.तसेच टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर खरेदी होताना दिसत आहे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'११ जून रोजी बेंचमार्क निर्देशांक किंचित वाढले,कारण उच्च पातळीवर नफा घेण्यामुळे दिवसाच्या आत वाढ कमी झाली.निफ्टी मजबूत पातळीवर उघडला आणि सत्राच्या मध्यात दिवसाच्या उच्चांकावर २५,२२२ पर्यंत पोहोचला आहे.तथापि,उच्च पातळीवर विक्रीच्या दबावामुळे निर्देशांकाची प्रगती कमी झाली आणि अखेर तो ३७ अंकांनी किंवा ०.१५% ने २५,१४१.४० वर स्थिरावला.'


निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'सकारात्मक पूर्वाग्रहादरम्यान निर्देशांक एका श्रेणीत एकत्रित झाला आणि किरकोळ वाढीसह बंद झाला.त्याने उच्च उच्च आणि उच्च निम्न एकत्रीकरणासह सकारात्मक पूर्वाग्रहासह एक डोजी कॅन्डल तयार केले आहे. गेल्या तीन आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणी २४४०० -२५१०० च्या वरच्या बँडच्यावर निर्देशांक टिकून असल्याचे दिसून येत आहे. आमचा विश्वास आहे की रचना सकारात्मक राहील आणि निर्देशांक २५३०० च्या तात्काळ अडथळ्याकडे आणि नंतर येत्या आठवड्यात २५५०० च्या दिशेने जाईल. येत्या सत्रांमध्ये होणारी घसरण खरेदीची संधी म्हणून वापरली पाहिजे आणि २४९००-२५००० पातळीवर तात्काळ अल्पकालीन समर्थन अलीकडील ब्रेकआउट क्षेत्र आहे.तर २४६००-२४७०० हा शुक्रवारच्या नीचांकी आणि २० दिवसांच्या EMA च्या संगमामुळे प्रमुख समर्थन क्षेत्र आहे.'


आजच्या बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'अलीकडील मजबूत अप हालचालीनंतर कमी उच्च आणि कमी नफा बुकिंग हायलाइट करणाऱ्या लहान बिअर कॅडल निर्देशांकाने सलग दुसऱ्या सत्रात सुधारात्मक (Reformed) घसरण वाढवली. बँक निफ्टीने अलीकडेच गेल्या ६ आठवड्यांच्या श्रेणीतील (५६०००-५३५००) वर ब्रेकआउट निर्माण केला आहे.आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक एकूण सकारात्मक पूर्वाग्रह राखेल आणि येत्या सत्रांमध्ये ५७३०० पातळींकडे जाईल.अल्पकालीन रचना रचनात्मक राहते कारण तात्काळ समर्थन ५५९०० पातळी (Support Level) आहे जो शेवटचा शुक्रवारचा ब्रेकआउट क्षेत्र आहे. तर प्रमुख समर्थन ५५४००- ५५५०० पातळीवर आहे जो २० दिवसांच्या EMA आणि प्रमुख रिट्रेसमेंट क्षेत्राचा संगम (Integration)आहे.'


वाढत्या मूल्यांकनांमुळे नफा बुकिंगमुळे भारतीय शेअर बाजार निराशाजनक स्थितीत संपला. देशांतर्गत मूल्यांकनात वाढ झाल्यामुळे व्यापक बाजारपेठांमध्ये नफा बुकिंग सुरूच आहे. तथापि, लार्ज-कॅप लवचिकता निर्देशांकांना आधार देत आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांची iPhone १७ खरेदीसाठी तुफान गर्दी !

पुणे : पुण्यात ॲपलने अधिकृत स्टोअर सुरू केले आहे. कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या या स्टोअरला पुणेकरांनी चांगलाच

ICC महिला विश्वचषक 2025: श्रेया घोषालच्या आवाजात ‘ब्रिंग इट होम’ थीम सॉन्ग प्रदर्शित!

मुंबई : महिला क्रिकेटमधील सामर्थ्य, एकता आणि थांबवता न येणाऱ्या जिद्दीचा उत्सव साजरा करत, इंटरनॅशनल क्रिकेट

Vasai Factory Fire: वसईत कारखान्याला भीषण आग

वसई: वसईत तुंगारेश्वर फाटा येथील पुठ्ठा कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील अनेक

इतिहासात प्रथमच ICICI Prudential Life Insurance ची गरुडझेप क्लेम सेटलमेंटमध्ये मोठी आघाडी

पहिल्या तिमाहीत ९९.६०% इतके विक्रमी क्लेम सेटलमेंट रेशोसह आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप नवी

Gold Silver Rate: जागतिक कारणांमुळे सोन्याचांदीत अनपेक्षित वळण, तीनदा झालेल्या घसरणीनंतर सोने महागले चांदीच्या दरातही वाढ

मोहित सोमण:भूराजकीय कालणासह युएस फेड व्याजदरातील कपातीनंतर सलग तीन दिवस घसरलेले सोने आज पुन्हा वधारले आहे.