वाकण महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

पाली-खोपोलीतील वाहनचालक, नागरिक त्रस्त


सुधागड-पाली : वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील दयनीय स्थितीमुळे प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः बिकानेर मिठाईच्या दुकानासमोरील खड्डे आणि विक्रम स्टँडच्या समोरील खड्डे हे मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.


पाली शहरातील हा महामार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, बिकानेर मिठाईच्या दुकानासमोरील मोठा खड्डा आणि विक्रम स्टँडच्या समोरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना वेग कमी करून सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेकदा अचानक ब्रेक लावल्याने मागील वाहनांची धडक लागण्याचा धोका निर्माण होतो.


सध्या पावसाळा तोंडावर आला असताना, महामार्गावरील खड्डे बुजवणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे अधिक खोल होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.


नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी एमएसआरडीसीने त्वरित दखल घेऊन महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होईल आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तक्रारींची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Majha Dusrikade Hay Suru : 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील करणारे ST महामंडळाचे कर्मचारी ३ दिवसांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत, सेवेत येताच केला नवा Video

पनवेल : राज्य परिवहन विभागाच्या गणवेशात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील / शॉर्ट व्हिडीओ करण्यास बंदी आहे. या बंदीचे

Maha Rojgar Melava : पनवेलमध्ये ‘महारोजगारमेळावा २०२६’ला हजारोंचाउत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचासहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ

पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या हजारो युवक-युवतींसाठी पनवेलमध्ये

MLA Prashant Thakur : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप

पनवेल : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त

Cyber Crime : रायगड पोलिसांची सायबर टोळीवर मोठी कारवाई; ३५ कोटींच्या गैरव्यवहाराचा भंडाफोड

रायगड  : डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष आणि विविध ऑनलाइन माध्यमांतून नागरिकांची

Matheran Heritage Mini-Train : माथेरानच्या हेरिटेज मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिन जोडण्याची तयारी

माथेरान : ब्रिटिशकालापासून सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणांवरून धावणारी जगप्रसिद्ध माथेरानची

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया