'पंचायत सीझन ४'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

  54

मुंबई : प्राइम व्हिडिओने प्रेक्षकांसमोर बहुप्रतिक्षित वेब सिरीज ‘पंचायत सीझन ४’ चा मजेदार आणि जोशपूर्ण ट्रेलर प्रदर्शित केला. द वायरल फीवर TVF निर्मित या सीझनचे लेखन चंदन कुमार यांनी केले आहे आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दीपक कुमार मिश्रा व अक्षत विजयवर्गीय यांनी सांभाळली आहे. नियोजनानुसार २४ जून २०२५ पासून, 'पंचायत सीझन ४' भारतासह जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.

फुलेरा गावात रंगणार राजकीय रणसंग्राम

‘पंचायत’चा हा नवीन भाग काल्पनिक फुलेरा गावावर आधारित असून, यावेळी गावात सत्तासंघर्षाचे वातावरण आहे. मंजू देवी आणि क्रांती देवी आमनेसामने उभ्या असून गावात रॅली, भाषणं, घोषणा आणि एकमेकांवर टीका-टिप्पणीचा धडाका लागलेला आहे. ट्रेलरमध्ये गावाचे वातावरण अक्षरशः मेळ्यासारखे भासते – ढोल, नगारे आणि देसी प्रचार गाण्यांसह.

प्रिय कलाकारांचे पुनरागमन

या सीझनमध्ये पुन्हा एकदा आपले आवडते कलाकार झळकणार आहेत – जीतेन्द्र कुमार (सचिव जी), नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवारआणि पंकज झा.

Comments
Add Comment

विविध मागण्यांसाठी लेखकांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

मुंबई : मानाचि लेखक संघटना मराठी भाषेतील मालिका नाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना आहे. या

गायिका सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना साद

मुंबई : वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं तसं अवघडच. जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक

अभिनेत्री जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा

मुंबई : नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून अनेक स्त्रिया वटपौर्णिमा साजरी

'ऑल इज वेल', माधव वझे यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट २७ जूनला प्रदर्शित होणार

मुंबई : आचार्य अत्रे लिखित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट १९५३ मध्ये आला. हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील

Sadaiva Tumchi Zee Marathi : एक नवा अध्याय! 'सदैव तुमची झी मराठी' – एक नवं रूप, नव्या नात्यांसह

मुंबई : ‘मी मराठी झी मराठी’ आपली नवीन ओळख आणि एक नवा अध्याय सुरू करत आहे. गेली २६ वर्ष महाराष्ट्राच्या घराघरांत

Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी