WTC Final सुरू होण्याआधीच MCC ला ४५ कोटी रुपयांचे नुकसान

लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final सुरू झाली. पण हा सामना सुरू होण्याआधीच लॉर्ड्सचे मैदान ज्यांच्या मालकीचे आहे त्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला चार मिलियन पाऊंड्स म्हणजेच जवळपास ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला नाही. यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी निराश झाले. याचा फटका बसला आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला तिकिटांच्या दरात कपात करावी लागली. जी तिकिटे आधीच विकली होती ती विकत घेणाऱ्यांना किंमत कमी केल्यामुळे निर्माण झालेल्या फरकाची रक्कम देण्यात आली. या संपूर्ण व्यवहारात मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

आयसीसीने २०२३ ते २०२५ दरम्यानच्या कसोटी मालिकांचा विचार करुन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी २०२३ ते २०२५ दरम्यान खेळलेल्या मालिकांतील जिंकण्याचे प्रमाण टक्केवारीच्या स्वरुपात सर्वोत्तम असलेल्या दोन संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळेल हे निश्चित होते. भारताने आधीच्या दोन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यामुळे भारत हॅटट्रिक करेल असा अंदाज व्यक्त होत होता. पण भारतीय संघ घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हरला. नंतर ऑस्ट्रेलियात जाऊन भारत खेळला. तिथे भारताचा ३-१ असा पराभव झाला. या दोन मालिकांतील पराभवांमुळे भारताच्या विजयाची टक्केवारी घसरली आणि हॅटट्रिक हुकली. याचा फटका मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला बसला.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ - २०२५
संघ - जिंकण्याचे प्रमाण (टक्केवारी)

  1. दक्षिण आफ्रिका - ६९.४४

  2. ऑस्ट्रेलिया - ६७.५४

  3. भारत - ५०

  4. न्यूझीलंड - ४८.२१

  5. इंग्लंड - ४३.१८

  6. श्रीलंका - ३८.४६

  7. बांगलादेश - ३१.२५

  8. वेस्ट इंडिज - २८.२१

  9. पाकिस्तान - २७.९८

Comments
Add Comment

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण