WTC Final : ट्रॅव्हिस हेडचा व्हेरेन बोल्डने घेतलेला थरारक झेल, कॅचचा Viral Video

लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवार ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final सुरू झाली. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज अवघ्या ६७ धावांत परतले. उस्मान ख्वाजा शून्य धावा करुन रबाडाच्या चेंडूवर बेडिंगहॅमकडे झेल देऊन परतला. मार्नस लाबुशेन १७ धावा करुन मार्को जॅनसेनच्या चेंडूवर व्हेरेनकडे झेल देऊन परतला. कॅमेरॉन ग्रीन चार धावा करुन रबाडाच्या चेंडूवर मार्करामकडे झेल देऊन परतला. ट्रॅव्हिस हेड ११ धावा करुन मार्को जॅनसेनच्या चेंडूवर व्हेरेनकडे झेल देऊन परतला. ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज लवकर बाद झाले. पण चर्चा सुरू आहे ती ट्रॅव्हिस हेड कसा झेलबाद झाला याचीच.

मार्को जॅनसेनने टाकलेला चेंडू वाईड जात आहे असे वाटत होते. पण अखेरच्या क्षणी ट्रॅव्हिस हेडने चेंडू फटकावला. ही ट्रॅव्हिस हेडने केलेली मोठी चूक होती. कारण ट्रॅव्हिस हेडने फटकावलेला चेंडू व्हेरेनने झेलला. व्हेरेनने एक सुंदर झेल घेतला. या झेलचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Comments
Add Comment

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK: पाकिस्तानचे ८ गडी बाद, धावसंख्या शंभर पार

दुबई: आशिया कपमध्ये आज सहावा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई