Int2 Cruises: आता क्रूझ हॉलिडे बुक करणे झाले सोपे !

  65

आशियामधील क्रूझ-फर्स्‍ट ओटीए' इण्‍ट२क्रूझेज' चा भारतात प्रवेश

 

मुंबई: भारतातील पर्यटकांच्‍या क्रूझवरील सुट्टीचा (Cruse Holiday Vacatios) शोध घेण्‍याासेबत बुक करण्‍याच्‍या पद्धतींना नवीन आकार देत इण्‍ट२क्रूझेज (Int2Cruises)  या आशियामधील क्रूझ-फर्स्‍ट ऑनलाइन ट्रॅव्‍हल एजन्‍सीने भारतातील बाजारपेठेत अधिकृतरित्‍या प्रवेश केला आहे. ५० वर्षांहून अधिक काळाचा एकत्रित जागतिक अनुभव (Pan World) असलेल्‍या क्रूझ उद्योग दिग्‍गजांनी हा प्‍लॅटफॉर्म निर्माण केला आहे. या व्यासपीठाचा गुंतागूंतीची व आवाक्‍याबाहेर मानल्‍या जाणाऱ्या या जहाजावरील सुट्टीच्या श्रेणीमध्‍ये सोयीसुविधा, पारदर्शकता आणि किफायतशीरपणाची भर घालण्याचा मनसुबा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

भारतातील विविध वयोगटातील कुटुंबे,तरूण एक्‍स्‍प्‍लोरर्स आणि विविध पिढ्यांमधील पर्यटक क्रूझवरील सुट्यांना मोठ्या प्रमाणात प्राधान्‍य देत आहेत. पण देशातील सद्यस्थितीत नियोजनासंदर्भात अडथळे कायम आहेत. अनेकदा क्रूझ, फ्लाइट्स, हॉटेल्‍स, व्हिसा आणि फेरफटका मारण्‍यासाठी स्‍वतंत्र बुकिंग्‍ज कराव्‍या लागतात.इण्‍ट२क्रूझेज ऑल-इन-वन डिजिटल प्‍लॅटफॉर्मसह या समस्‍येचे निराकरण करते असा कंपनीचा दावा आहे. ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना (Users)ना जागतिक क्रूझ लाइन्‍समधील शिप्‍स,प्रवास योजना आणि रिअल-टाइम किमतींशी तुलना करता येते, तसेच आपल्या आवडत्या सहली व्‍हेकेशनमधील प्रत्‍येक घटकासाठी फुल-सर्विस पाठिंबा मिळतो.

इण्‍ट२क्रूझेजच्‍या सीएमओ आकांक्षा अग्रवाल म्‍हणाल्‍या,'आज भारतातील पर्यटक आत्‍मविश्‍वासू,डिजिटली जाणकार आहेत आणि याशिवाय संस्‍मरणीय अनुभवांचा शोध घेत आहेत.पण क्रूझ बुकिंग अजूनही गुंतागूंतीचे आणि त्रासदायक आहे. इण्‍ट२क्रूझेजसह आम्‍ही विनासायास,एण्‍ड-टू-एण्‍ड प्‍लॅटफॉर्म डिझाइन केला आहे,जो त्रास दूर करतो आणि नियोजन प्रक्रियेमध्‍ये आनंदाची भर घालतो.हा प्‍लॅटफॉर्म क्रूझ बुकिंग सोपे,पारदर्शक करतो,ज्‍याला तज्ञांचे पाठबळ आहे.'

हा प्लॅटफॉर्म सर्व प्रमुख क्रूझ लाइन्समधील लाइव्ह इन्‍व्‍हेण्‍टरी एकत्रित करतो. काही कंपन्‍यांची नावे आहेत रॉयल कॅरिबियन,नॉर्वेजियन क्रूझ लाइन,सेलिब्रिटी क्रूझ,सिल्व्हर्सी,एमएससी क्रूझ,कोस्टा,अमा वॉटरवेज,व्हायकिंग रिव्हर क्रूझ आणि डिस्नी क्रूझ लाइन,जी वापरकर्त्यांना रिअल टाइममध्ये केबिन प्रकार,भाडे आणि डिपार्चर तारखांची तुलना करण्याची सुविधा देतात.फक्‍त तीन क्लिक्ससह प्रवासी कोणतेही न लपलेले शुल्क,शून्य सेवा शुल्क आणि अनेक सुरक्षित पेमेंट पर्यायांसह सुरक्षितपणे बुकिंग करू शकतात.केबिन देखील विनामूल्य बुकिंग करता येतात,नंतर पैसे देण्याची सुविधा असते,ज्यामुळे संपूर्ण नियोजन प्रक्रियेत सोयीसुविधा मिळण्‍यासोबत नियंत्रण ठेवता येते.

इण्‍ट२क्रूझेजला वरचढ ठरवणारी बाब म्‍हणजे त्‍यांचे तंत्रज्ञान-नेतृत्वित,सर्विस-फर्स्‍ट तत्त्व. एआय (Artificial Inteligence)आणि मशिन लर्निंग (Machine Learning)वैयक्तिक प्रवास प्राधान्‍यक्रम व हिस्‍ट्रीवर आधारित वैयक्तिकृत क्रूझ शिफारशी देतात.रिअल-टाइम सपोर्टसाठी समर्पित क्रूझ तज्ञ नेहमी चॅट किंवा कॉलच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असतो.हा प्‍लॅटफॉर्म बुकिंग प्रक्रिया सोपी करण्‍यासह एण्‍ड-टू-एण्‍ड हॉलिडे नियोजन देतो,ज्‍यामध्‍ये व्हिसा व विमा साह्य,सर्वोत्तम क्रूझपूर्व व क्रूझ-नंतर स्‍टे,गंतव्‍यानुसार समुद्रक्रिनाऱ्यावरील हॉलिडेज आणि सोपी एअरपोर्ट ने-आण या सगळ्या सुविधा इकोसिस्टिमचा यांचा समावेश आहे असे कंपनीने म्हटले आहे.कंपनी भारतीय बाजारात येताना ग्राहकांना दर्जेदार व किफायतशीर दरात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Comments
Add Comment

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन