रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आता तिकीट आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या २४ तास अगोदरच जाहीर होणार

  136

मुंबई : मुंबईसह देशभरात रेल्वे अपघातांची संख्या वाढली आहे. यासह रेल्वे प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे भारतीय रेल्वे विभाग सातत्याने टीकेचा सामना करत आहे. अशातच भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेकडे अधिक लक्ष देत काही बदल करण्याचं ठरवलं आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी भारतीय रेल्वे तिकीट बूकिंग नियमांमध्ये काही बदल करणार आहे. रेल्वे प्रवाशांची रिझर्व्हेशन यादी आता प्रवास सुरू होण्याच्या २४ तास आधी तयार केली जाईल. याचाच अर्थ वेटिंगवर असलेल्या (वेटलिस्टेड) प्रवाशांना आता २४ तास आधीच समजेल की त्यांचं तिकीट कन्फर्म झालंय की नाही.


रेल्वेने याबाबतची माहिती देताना म्हटलं आहे की ज्या प्रवाशांचं तिकीट वेटिंगवर असेल त्यांना रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी माहिती दिली जाईल की त्यांचं तिकीट कन्फर्म झालंय की नाही. याआधी रेल्वेची कन्फर्मेशन यादी (चार्ट) ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी जारी केली जात होती. त्यामुळे वेटलिस्टेड प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कारण तिकीटाच्या पुष्टीसाठी शेवटपर्यंत कोणतीही निश्चित माहिती मिळत नव्हती. मात्र,त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असे.आता रेल्वे प्रवाशांची चिंता दूर करण्यासाठी प्रशासनाने मोठं पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे.



रेल्वे अधिकाऱ्यांनाही होणार फायदा


रेल्वे प्रशासन करत असलेल्या या बदलामुळे अधिकाऱ्यांना, स्टेशन मास्तरांना, रेल्वेंचं नियोजन करणाऱ्यांना अधिक चांगलं प्लॅनिंग करण्यास मदत मिळेल. किती प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट आहे, किती प्रवासी वेटलिस्टेड आहेत यासह बरीच माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडे २४ तास आधीच उपलब्ध असेल. प्रवाशांची संख्या पाहून रेल्वे प्रशासन इंजिनाला अधिक डबे जोडू शकतं किंवा कमी करू शकतं, प्रवाशांसाठी पुरेशी आसनव्यवस्था करू शकतं. तसेच फलाटांवरील व्यवस्थेकडे लक्ष देऊ शकतं.दरम्यान, रेल्वे प्रशासनाने विद्यमान तिकीट प्रणालीत, तिकीट नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तत्काळ तिकीट बूकिंग व इतर सर्व आरक्षण प्रक्रिया जैसे थे स्थितीत सुरू राहतील. रेल्वेने केवळ एकच बदल केला आहे. केवळ फायनल रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याची वेळ बदलली आहे. हा चार्ट पूर्वी ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी तयार केला जात होता जो आता २४ तास आधी तयार केला जाईल. ज्यामुळे प्रवाशांना अधिक फ्लेक्सिबिलीटी व पर्याय मिळतील.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर