मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर


बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन


मुंबई : इंडिया मेरिटाईम वीक २०२५ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याने हे राज्यासाठी मोठे यश असल्याचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून झालेल्या या भव्य गुंतवणुकीबद्दल त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.


विधानभवन, मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विधानपरिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सत्र पार पडले. या चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दरेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे विभागात झालेल्या गुंतवणुकीचा विशेष उल्लेख केला. दावोस येथील गुंतवणुकीची चर्चा नेहमीच होते; मात्र इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधून महाराष्ट्रासाठी झालेली ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही राज्याच्या आर्थिक विकासाला नवे बळ देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.


ऑक्टोबर २०२५ मध्ये गोरेगाव (नेस्को) येथे पार पडलेल्या इंडिया मेरिटाईम समिटमध्ये देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेत बंदरे, जलपरिवहन, लॉजिस्टिक्स व किनारपट्टी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बंदरे खात्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांची आणि गुंतवणुकीची दखल घेत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन केले.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि