Rajasthan Accident : साथ जन्माची गाठ अधुरी! भीषण अपघातात वधू-वरासह ५ जण जागीच ठार

जयपूर : राजस्थानच्या जयपूर येथे आज, बुधवारी ट्रक आणि जीपची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. दौसा-मनोहरपूर मार्गावर भटकबास गावानजीक सकाळी ६.१५ वाजता झालेल्या या भीषण अपघातात लग्न करून घरी परतणारे वर-वधू देखील मृत्यूमुखी पडलेत.



पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. जीपमधील लोक लग्न समारंभाला उपस्थित राहून मध्यप्रदेशहून परतत होते. स्थानिक लोकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. लोकांच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले.जखमींना निम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात रायसर पोलिस स्टेशनचे प्रभारी रघुवीर म्हणाले रीस अपघातानंतर महामार्गावर जाम झाला आणि गोंधळ उडाला. वऱ्हाडींची जीप मध्यप्रदेशहून मनोहरपूरला जात होती. जखमींचे जबाब घेतले जात आहेत. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली जात आहे. काही गंभीर जखमींना एनआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या