Corona Virus : सावधान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट डोकं वर काढतोय!

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि डोकेदुखी


भारतात काय आहे सद्यस्थिती ?


भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोकं वर काढलंय. अधिक चिंतेची बाब म्हणजे एक नवीन व्हेरिएंट ज्याचं नाव आहे XFG तो पसरायला लागलाय. गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोना वाढताना दिसतो. कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ५००च्याही पुढे गेलीय, त्यामुळे हा XFG व्हेरिएंट नेमका आहे तरी काय? आणि यामुळे किती धोका आहे? कशी काळजी घ्याल ? जाणून घ्या या लेखातून...


?si=L1VLbI73fESROB_o

भारतीय SARS-CoV-२ जीनोमिक्स कन्सोर्टियमनुसार, भारतात आतापर्यंत XFG व्हेरिएंटचे १६३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ८९ रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तामिळनाडूत १६, केरळात १५, गुजरातमध्ये ११ आणि आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ६ रुग्ण आहेत.



आता पाहूयात XFG व्हेरियंट म्हणजे काय ?


XFG हा एक रिकॉम्बिनंट सबव्हेरिएंट आहे. LF.७ आणि LP.८.१.२ या दोन व्हेरिएंट्सच्या संयोगातून XFG तयार झालाय. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या व्हेरिएंट्सची बाधा होते तेव्हा त्यांचे जनुकीय मिसळली जातात आणि नवीन व्हेरिएंट जन्म घेतो. लॅन्सेट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, XFG हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा भाग आहे. हा XFG व्हेरिएंट २०२१ पासून जगभरात हळूहळू पसरतोय. हा व्हेरिएंट कॅनडात प्रथम आढळला. विशेष बाब म्हणजे XFG हा व्हेरिएंट तुमची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती कमी करतो आणि शरीरात अगदी सहजपणे पसरतो.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या काही तासांमध्ये ७६९ नवीन रुग्णांची नोंद झालीय. तर सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ५००च्या वर गेलीय. ही वाढ भारताची चिंता वाढवणारी आहे. XFG व्हेरिएंट हा ओमिक्रॉनचा भाग आहे. आता भारतात उपलब्ध असलेल्या लसी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतात. तरीही XFG पासून दूर राहायचं असेल तर बूस्टर डोस आणि मास्कचा वापर अधिक महत्त्वाचा आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आणि गंभीर आजार असलेल्यांना अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर लसीकरण, मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि दोन व्यक्तींमधील योग्य अंतर पाळावं लागणार आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये XFG चे रुग्ण आढळले आहेत.



सध्या तरी रुग्णालयांवर याचा फारसा ताण पडलेला नाही. तरीही स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. कोरोनाच्या या नव्या लाटेला रोखण्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणा कठोर पावलं उचलत आहे. नागरिकांना मास्क वापरणं, गर्दी टाळणं आणि लसीकरण पूर्ण करण्याचं आवाहन केलं जातंय. विशेषतः बूस्टर डोस घेणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. असं असलं तरी प्रत्येकाने काळजी घेणं तितकंच गरेजचं आहे. कोरोना व्हायरसने आपल्याला गेल्या काही वर्षांत खूप काही शिकवलंय. XFG व्हेरिएंटमुळे पुन्हा सावध राहण्याची वेळ आलीय. मात्र योग्य खबरदारी आणि प्रयत्न केले तर यावरही आपण मात करू शकतो. तेव्हा काळजी घ्या, नियम पाळा आणि कोरोनामुक्त जीवन जगा.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी