हिना खाननंतर आता बॉलीवूड अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त; घेतला 'हा' निर्णय!

  81

कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीला आता चाहत्यांच्या प्रार्थनांचा आधार


मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती तनिष्ठा चॅटर्जी सध्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तनिष्ठा यांना चौथ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग (Stage 4 Breast Cancer) झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. या धक्कादायक बातमीनंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ती लवकरच बरी व्हावी यासाठी साऱ्यांकडून प्रार्थना सुरू आहेत.



चार महिन्यांपूर्वी मिळाला होता दुर्दैवी निदान


एका मुलाखतीत तनिष्ठाने अत्यंत भावनिक शब्दांत तिच्या आजाराविषयी आणि संघर्षांविषयी मोकळेपणाने सांगितले. चार महिन्यांपूर्वी तिला कर्करोगाचे निदान झाले आणि त्यावेळी ती पूर्णपणे खचली होती. याआधीच तिने वडिलांना कर्करोगामुळे गमावले होते. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर येण्याआधीच आयुष्याने तिला दुसरा आघात दिला.



“हे फक्त माझ्याच नशिबी का?” – तनिष्ठाची भावना


तनिष्ठा भावनिक होत म्हणते, "मी नेहमी स्वतःला मजबूत ठेवत आले आहे, पण या वेळी मी थकले आहे. कधीही वाटले नव्हते की आयुष्यात असं काही होईल. जेव्हा हा आजार समजला, तेव्हा मनात पहिला प्रश्न आला, हे फक्त माझ्याच बाबतीत का घडले?"


या काळात तिच्यावर ७० वर्षांच्या आईची आणि ९ वर्षांच्या मुलीची जबाबदारी होती, जी तिच्यासाठी अधिक कठीण ठरत होती. पण तरीही ती परिस्थितीला सामोरी गेली, कारण ती फक्त एक अभिनेत्री नाही, तर एक जबाबदार आईही आहे.



मुलीच्या भविष्यासाठी घेतला मोठा निर्णय


या संकट काळात तनिष्ठाने एक मोठा निर्णय घेतला. तिने तिच्या मुलीला अमेरिकेला मावशीकडे पाठवले. मुलगी तिला सोडून जायला तयार नव्हती, पण तनिष्ठाने तिच्या मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी हा कठोर निर्णय घेतला. "प्रेम आणि माया केवळ आईकडूनच मिळते, असं नाही; हे तिला समजवण्याचा प्रयत्न केला," असं तनिष्ठाने सांगितले.


तिने तिच्या मुलीला अमेरिकेत पाठवले आहे जेणेकरून तिचे बालपण या परिस्थितींना बळी पडू नये. तिने सांगितले की मुलगी तिच्यापासून दूर जाऊ इच्छित नव्हती परंतु तिने तिला तिच्या मावशीकडे पाठवले जेणेकरून तिला एकटे वाटू नये आणि या आजाराचा तिच्या आयुष्यावर परिणाम होऊ नये. तनिष्ठा पुढे म्हणाली की तिने तिच्या मुलीला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की प्रेम आणि आपुलकी केवळ आईकडूनच नाही तर इतर लोकांकडूनही मिळू शकते. तिने तिच्या मुलीच्या मानसिक आणि भावनिक फायदाच्या विचार करून हे पाऊल उचलले आहे.

Comments
Add Comment

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन