बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या बॅगेतून वन्यजीव ताब्यात

प्रवाशाला अटक; मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत दुर्मीळ वन्यजीव सापडले असून विभागाने या प्राण्यांची सुटका केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी प्रवाशाला अटक केली आहे. तो आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधीत असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.



मुंबई विमानतळावर बँकॉक येथून आलेल्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यामुळे सीमाशुल्क विभागाने त्याला अडवले. चौकशीत प्रवासी घाबरलेला व अस्वस्थ दिसून आल्यामुळे अधिक तपास करण्यात आला. त्यावेळी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात दुर्मीळ आणि संरक्षित वन्यजीव सापडले आहे. सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे एक चाको गोल्डन नी टरंट्युला, एक ब्रान्चपेल्मा टरंट्युला, ८० इग्वाना, सहा ल्युसिस्टिक शुगर ग्लायडर, एक फायर टेल्ड सनबर्ड, एक पर्पल थ्रोटेड सनबर्ड, दोन क्रेस्टेड फिंचबिल, एक हनी बेअर, दोन ब्राझिलियन चेरी हेड कासवे सापडली. त्यातील ३० इग्वाना, एक पर्पल थ्रोटेड सनबर्ड व एका फायर टेल्ड सनबर्डचा यांचा समावेश आहे. याबाबत सीमाशुल्क विभागाने पंचनामा केल्यानंतर सर्व प्राणी ताब्यात घेण्यात आले.


वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने त्यांची देखभाल सुरू आहे. सर्व प्राण्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याप्रकरणी आरोपी प्रवाशाविरुद्ध सीमा शुल्क कायदा, १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या तस्करी मागे आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करांच्या टोळीचा संबंध असल्याचा संशय आहे. त्याबाबत आरोपी प्रवाशाची चौकशी करण्यात आली.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम