पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर

सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढरीत गर्दी करतात. या गर्दीच्या नियंत्रणासाठी ड्रोन, एआयचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून दीड कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. आषाढी वारीला कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणातून लाखो वारकरी पायी येतात. या गर्दीच्या नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञान आणि ड्रोनचा वापर पोलीस करणार आहेत.

दर तीन ते चार किलोमीटर अंतरावर वारकर्‍यांच्यासाठी विसावा उपलब्ध करून दिला जाणार आहे. या विसाव्याच्या ठिकाणी बेड, पाणी, शौचालय, वैद्यकीय उपचार अशा सुविधा पुरवल्या जातील. वारीमार्गातील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याने मुरुमीकरण सुरू आहे.

आषाढी वारीनिमित्त चंद्रभागेत स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी होते. सध्या पंढरपूर येथील नदीत पाणी उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार १८ जून २०२५ रोजी उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. ते पाणी २५ जून २०२५ पर्यंत चंद्रभागा नदीत पोहोचेल, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या