घाटकोपर पूर्व येथे बनतोय अनधिकृत कचरा डेपो

पालिका अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


मुंबई : घाटकोपर पूर्व बेस्ट बस डेपो शेजारील मोकळ्या भूखंडावर महापालिका आणि खाजगी ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून या ठिकाणी अनधिकृतपणे कचरा डेपो बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. घाटकोपर पूर्वेकडील बेस्ट आगारा शेजारील भूखंडावर असणाऱ्या झोपड्या न्यायालयाच्या आदेशानुसार निष्काशित करण्यात आल्या होत्या.



या मोकळ्या भूखंडावर पालिकेच्या एन विभागाने नियुक्त केलेले काही ठेकेदार मोठ्या प्रमाणात नालेसफाईतील गाळ व कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या दृष्टीने ही बाब हानिकारक होऊ शकते. वास्तविक हा संपूर्ण कचरा मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात यायला हवा; परंतु तो या ठिकाणी टाकला जात आहे. यामागे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता असल्याचा संशय मेहता यांनी या पत्राद्वारे व्यक्त केला आहे. याबाबत सखोल चौकशी करून सदर ठेकेदार आणि संबंधित महापालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मेहता यांनी केली आहे.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या