चेंबर, ड्रेनेज लाईनच्या साफसफाईसाठी दोन नवीन अत्याधुनिक वाहने

  38

आ. संग्राम जगताप : नवीन वाहनांमुळे तक्रारींवर तत्काळ उपाययोजना होतील


अहिल्यानगर : दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत आहे. लोकसंख्या वाढत आहे.त्याच प्रमाणात सेवा व सुविधांची मागणीही वाढत आहे. त्यासाठी महानगरपालिकेची सेवा व सुविधा पुरवणारी यंत्रणा


बळकट असणे आवश्यक आहे.याच दृष्टिकोनातून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहरातील ड्रेनेज लाईन,चेंबरची तत्काळ व अधिक प्रभावीपणे साफसफाई होण्यासाठी महानगरपालिकेला अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून दिली आहे. या वाहनांमुळे नागरिकांच्या तक्रारीवर तत्काळ कृती होऊन त्यांच्या समस्याही तत्काळ सोडवता येतील,असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.


आ.जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सक्शन अँड जेटिंग वाहनांचे लोकार्पण आ.जगताप व आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते सोमवारी महानगरपालिकेत पार पडले.दोन वाहने उपलब्ध झाली असून,७ टन क्षमतेच्या वाहनाचे लोकार्पण सफाई कामगारांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपायुक्त संतोष टेंगळे,विजयकुमार मुंडे व महानगरपालिकेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.आ.जगताप म्हणाले की,महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडवते.


मात्र,अनेकवेळा साधन सामग्री अथवा अद्ययावत मशिनरी नसल्यामुळे समस्या सोडवताना अडथळे येतात किंवा उपाययोजनांसाठी वेळ लागतो.त्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा अत्याधुनिक साहित्य,साधन सामग्रीसह सज्ज असणे आवश्यक आहे.त्यामुळे हे नवीन वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असून,या काळात निर्माण होणाऱ्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी याचा प्रभावीपणे वापर होईल,असा विश्वासही आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की,ड्रेनेज लाईन,चेंबर साफसफाईसाठी ही गाडी राज्य शासनाकडून आ.जगताप यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.१८.५० टन क्षमतेच्या या वाहनात तीन प्रकाराच्या सुविधा उपलब्ध आहेत.


ड्रेनेज,चेंबरमधील मैला उपसा करून त्यावर या गाडीतच प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे.त्यामुळे प्रक्रिया होऊन उपलब्ध होणारे पाणी जेटिंगसाठी वापरता येते.त्यासाठी वाहनात नव्याने पाणी भरण्याची आवश्यकता नाही.या वाहनात ८ हजार लिटर क्षमतेची टाकी आहे. दुसरे वाहन ७ टन क्षमतेचे असून त्यात ३ हजार लिटर क्षमतेची टाकी आहे.वाहन चालक व कर्मचाऱ्यांना उत्तमरीत्या प्रशिक्षण देऊन तयार केलेले आहे.या वाहनामुळे कुठलाही भार महानगरपालिकेवर पडणार नाही.थ्री इन वन वाहन असल्याने व प्रतिदिन सलग आठ तास काम करण्याची या गाडीची क्षमता असल्याने नागरिकांच्या समस्या वेळेत व अधिक चांगल्या पद्धतीने सोडवता येतील.

Comments
Add Comment

शेतीला आता AI ची जोड! आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मिळणार दुप्पट मानधन; मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय

राज्यात AI शेतीधोरणास मंजुरी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ

बीड : संतोष देशमुख हत्याप्रकरणाची सुनवणी पुढे ढकलली? 

बीड : बीड जिल्हातील संतोष देशमुख हत्याप्रकरणतील (santosh deshmukh murder case)  सुनावणी पुढे ढकलण्यात आली. मकोका न्यायालयातील

साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य समेलंन, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड...

  सातारा : साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळे या ९९ व्या मराठी साहित्य

Freyr Solar Energy Maharashtra: ठरले ! फ्रेयर एनर्जी महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्षेत्रात उचलणार मोठे पाऊल!

महाराष्ट्रात २०००० हून अधिक, व २००० एसएमई उद्योगांना सौर ऊर्जा पुरवठा करणार प्रतिनिधी: फ्रेयर एनर्जी

पालखी महामार्गावरील अपघातात एक महिला ठार; सहाजण जखमी

सोलापूर : नातेपुते शहराच्या पश्चिमेस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील समाधान ढाब्याजवळ व्हॅनचा

पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...

मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य