पर्यावरण संवर्धनासाठी सुहासिनींचा वटपौर्णिमेसाठी अभिनव संकल्प

वडाच्या झाडाचे प्रतीकात्मक चित्र रेखाटून पूजन


ठाणे :वटपौर्णिमेच्या निमित्ताने पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणाऱ्या सुहासिनींनी यंदा पर्यावरण रक्षणाचा मंत्र हृदयात बाळगून एक अभिनव संकल्प केला आहे. दरवर्षी वडाच्या फांद्या कापून पूजा करण्याऐवजी, यंदा त्या वडाच्या झाडाचे प्रतिकात्मक चित्र रेखाटून पूजन करणार आहेत.



या उपक्रमामुळे झाडांच्या फांद्या तोडण्याची गरजच उरणार नाही. परिणामी, वड वृक्षाचं रक्षण होणार असून, पर्यावरणसंवर्धनात महिलांचा ‘खारीचा वाटा’ अधिक ठळकपणे समोर येणार आहे.
शहरीकरणाच्या वाढत्या लाटेत ठाणे शहरात वड, पिंपळ आणि उंबर यासारखी स्थानिक झाडं जवळजवळ अदृश्य होऊ लागली आहेत. परिणामी, महिलांना वटपौर्णिमेला पूजनासाठी झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात, ज्यामुळे झाडांना इजा पोहचते.


या पार्श्वभूमीवर, यंदा अनेक महिलांनी पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्धार केला आहे. काहींनी प्रतिकात्मक वडाच्या झाडाचं चित्र रेखाटण्याचा, तर काहींनी रंगवलेले पोस्टर तयार करून पूजन करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या उपक्रमामागे पर्यावरणप्रेमी आणि सजग नागरिकांचा सक्रिय सहभाग असून, श्रद्धा जपणारा हा उपक्रम भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती