बेस्टच्या मालकीच्या बस ताफ्यात घट

मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या बस ताफ्यात मोठी घट होत आहे. १ जूनपर्यंत बेस्टकडे फक्त ४३७ बस आहेत. एकूण २,५९४ बसच्या कार्यरत ताफ्यातील १७% आहेत. उर्वरित २,१५७ बस (८३%) खासगी कंत्राटदारांसोबतच्या भाडेपट्टा करारांनुसार चालवल्या जातात. ताफ्याच्या रचनेत झालेला हा मोठा बदल सेवा विश्वासार्हता आणि प्रवाशांच्या सोबीबद्दल चिंता निर्माण करत आहे.


अलीकडील आकडेवारीनुसार, बेस्ट बसेसची एकूण संख्या २,६०० पेक्षा कमी झाली आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या, वाहतूक आश्रित महानगरासाठी ही चिंताजनक प्रवृत्ती आहे, असे बेस्टच्या एका युनियन नेत्याने सांगितले. सूत्रांनुसार, मालकीच्या ताफ्यात झपाट्याने घट झाली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये बेस्टकडे अंदाजे १,५०० बसेस होत्या. एप्रिल २०२४ पर्यंत ही संख्या १,१०० पर्यंत घसरली होती. ती ४३७ पर्यंत घसरली होती.


सरकारी नियमांनुसार १५ वर्षांच्या परिचालन मयदिपेक्षा जास्त बस टप्प्याटप्प्याने बंद केल्यामुळे ही घट झाली आहे. बसची संख्या कमी झाल्यामुळे आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसेसवरील अवलंबित्व वाढल्याने अनेक प्रवाशांना जास्त वेळ वाट पाहावी लागत आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्टने तिकिट दर वाढवले. दैनिक पास ६० रुपयांवरून ७५ रुपये करण्यात आला. भाडे दुप्पट झाले. बिगर-वातानुकूलित बसेससाठी १० रुपये, १२ रुपये आहे. परिणामी, बेस्ट बसमधून कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.

Comments
Add Comment

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या