Rajasthan: पिकनिकसाठी गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

  83

जयपूर : राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये पिकनिकसाठी आलेले ११ तरुण बनास नदीत अंघोळीसाठी उतरलेले असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे. यापैकी ८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले आहेत.सोमवारी (दि.१०)दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. बनास नदीच्या एका जुन्या पुलापाशी हे तरुण पिकनिकसाठी आले होते.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण एकत्रच पाण्यात उतरले होते. परंतू, काही वेळातच पाण्याचा वेग वाढला आणि सर्वजण एकामागोमाग एक पाण्यात खेचले गेले. स्थानिकांनी आरडाओरडा करत पोलिसांना याची माहिती दिली. टोंक पोलीस आणि एसडीआरएफची टीम तिथे पोहोचली परंतू तोवर उशीर झाला होता. या तरुणांना शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी ८ तरुणांचे मृतदेह सापडले आहेत.


या सर्वांना सआदत ह़ॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून डॉक्टरांनी या सर्व आठही जणांना मृत घोषित केले आहे. एसपींनी सांगितले की, तीन तरुण जिवंत आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली जात आहे.गावकऱ्यांनुसार ज्या भागात ते उतरले होते तो खोलगट आहे. यामुळे अनेकजण तिथे बुडालेले आहेत. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने मृतांचे नातेवाईक, स्थानिक जमा झालेले आहेत. सर्वजण जयपूरचे असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा