ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजअर्थविश्व
Stock Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजारात युटर्न ? आयटीचा धूमाकूळ तर बँक निर्देशांकात नुकसान सेन्सेक्स ५३.४९ अंशाने व निफ्टी ' जैसे थे '
June 10, 2025 04:39 PM
मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने एकप्रकारे आज 'युटर्न ' मारला. सकाळच्या सकारात्मक वातावरणात गिफ्ट निफ्टी वाढल्यानंतर सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) मध्ये वाढ झाली होती. बाजाराने बंद होताना अखेरच्या सत्रात युटर्न घेतला. परिणामी सेन्सेक्स काही प्रमाणात कोसळला आहे तर निफ्टी सपाट राहिला आहे. सेन्सेक्स ५३.४९ अंशाने घसरत ८२३९१.७२ अंकावर स्थिरावला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक 'जैसे थे ' राहत १५१०४.२५ पातळीवर कायम राहिला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात कालप्रमाणे आजही ६२.८९ अंशाने व निफ्टी बँक निर्देशांक २१०.५० अंशाने कोसळल्याने बाजारात पडझड झाली आहे. बाजारातील सपोर्ट लेवल घरंगळण्यास आज बँक निर्देशांक कारणीभूत ठरला आहे.
आज शेअर बाजारातील निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये सर्वाधिक वाढ आयटी (१.६७%), कमोडिटी (०.५१%), फार्मा (०.५६%), मिडिया (१.०९%) समभागात झाले आहे. तर सर्वाधिक नुकसान बँक (०.३७%), पीएसयु बँक (०.५२%) रिअल्टी (१.१४%) समभागात (Shares) मध्ये झाले आहे. रिअल्टी व पीएसयु समभागात गेल्या आठवड्यात अनुक्रमे ६.८९ व १.१६ टक्क्याने वाढ झाली असली तरी गेल्या दोन दिवसांत या समभागात घसरण झाली आहे. रेपो दराचे पतधोरण सकारात्मक असले तरी बाजारातील दबाव यासाठी कारणीभूत ठरला आहे. दुसरीकडे बँकिंग समभागात होत असलेली घसरण झाल्याने एचडीएफसी (HDFC) सारख्या तगड्या समभागात ०.८१ टक्क्याने व रिलायन्ससारखा समभागात ०.७९ टक्क्याने घसरण झाल्याने बाजारातील पातळी घसरली. मात्र आयटी, फार्मा, मिडिया समभागात वाढ झाल्याने बाजार पातळी निर्देशांक सपाट किंवा एकप्रकारे ' इक्विलिब्रियम' राहिला आहे.
सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.२३ टक्क्याने घसरण झाली होती तर स्मॉलकॅपमध्ये ०.३३% टक्क्याने वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप ०.२३% घसरला आहे तर निफ्टी स्मॉलकॅपमध्ये ०.१४% वाढ झाली आहे. आज निफ्टी सलग पाचव्या दिवशी ग्रीन राहिल्याने बाजारात आशा कायम आहे. आज बाजारातील भारतीय अस्थिरता निर्देशांक (Indian VIX Volatility Index) आज ४.६१ टक्क्याने घसरला होता. ज्याचा फायदा अंतिमतः बाजाराला झाला ज्यामुळे काही अंशी बाजारातील समभागात किंचित अधिक स्थिरता स्पष्ट झाली आहे. सेन्सेक्स मधील महत्वाच्या ३० पैकी १६ समभागात घसरण झाल्याने निर्देशांक घटला. ज्यामध्ये बँक निर्देशांकाचा मोठा वाटा आहे. फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या मार्गाबद्दल माहिती मिळविण्यासाठी गुंतवणूकदार या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेच्या चलनवाढीच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत.
आज बाजारातील गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा प्रीजम जॉन्सन (९.२४%), जिंदाल सॉस (६.८६%), अलोक इंडस्ट्रीज (६.८१%), टाटा इनव्हेसमेंट कॉर्पोरेशन (६.२७%), अदानी पॉवर (५.८६%), नेटवर्क १८ इंडिया (४.८५%), ग्रासीम इंडस्ट्रीज (३.८१%), अदानी ग्रीन एनर्जी (२.५३%), डॉ रेड्डीज (२.२५%), टाटा मोटर्स (२.०१%), इन्फोसिस (१.४७%), विप्रो (१.४२%), टीसीएस (१.२०%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.२०%) या समभागात झाला आहे तर वेस्टलाईफ फूड (३.७५%), इंडियन बँक (३.६७%), आरबीएल बँक (३.६१%), एनबीसीसी (३.०२%), बँक ऑफ इंडिया (२.३२%), मॅक्रोटेक डेव्हलपर (२.९३%), अव्हेन्यू सुपरमार्ट (२.३७%), एलआयसी (१.६०%), आयआरएफसी (१.१८%), बजाज फायनान्स (१.१४%), रिलायन्स (०.७१%), एचडीएफसी (०.६९%) समभागात पडझड झाली आहे.
आज अमेरिका चीन यांच्यातील व्यापारसंबंधी चर्चेचा अंतिम टप्पा होता. जगातील या दोन मोठ्या अर्थव्यवस्थेचा व्यापारी संबंधांचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे आज गुंतवणूकदारांनी सावधतेने पावले उचलली असावीत असा कयास आहे. आज दिवसभरात कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ होत राहिली होती. तसेच सोन्याच्या दरात घट झाली. डॉलरमध्ये आज दिवसभरात केवळ चार पैशाने घट झाल्याने त्याचा महत्तम फायदा झाला नाही. आज अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्स (Dow Jones) मध्ये ०.०२% पडझड झाली होती तर एस अँड पी ५०० (S & P 500) मध्ये ०.०९% वाढ, नासडाक (NASDAQ) मध्ये ०.३१% वाढ झाली आहे. आशियाई बाजारात गिफ्ट निफ्टी अखेरीस सपाट झाल्यानंतर हेगसेंग (Heng Seng) ०.०८% व शांघाय (०.४४%) नुकसान झाले आहे. निकेयी (Nikkei 225) बाजारात ०.३२% वाढ झाली आहे. मे महिन्यात म्युच्युअल फंडांचा ओघ १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.सलग पाचवी मासिक घसरण म्युच्युअल फंड गुंतवणूकीत झाली आहे ज्याचा फटका बाजारात बसला. लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप फंडांनीही ओघ कमी केल्याचे बाजारातील अहवालात नोंदवले गेले होते.
आर्थिक आघाडीवर, बँकिंग व्यवस्थेतील तरलता अधिशेष अंदाजे ३ लाख कोटींपर्यंत पोहोचल्यामुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ११ जून २०२५ पासून दैनिक व्हेरिएबल रेट रेपो (VRR) लिलाव बंद करण्याची घोषणा केली आहे. आयटी समभागात झालेल्या रॅलीमुळे नवीन प्रवेशद्वार बाजारात खुले झाले तर दुसरीकडे बाजारातील काही वर्ग नफा बुकिंग (Profit Booking) मध्ये जाऊ शकतो असाही अंदाज बाजार तज्ञ व्यक्त करत आहेत.
ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजनाशिक
July 21, 2026 06:18 PM
Nashik News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहर बँक असोसिएशन (‘न्युबा’) अंतर्गत जिल्ह्यातील २७ बँकांच्या
ताज्या घडामोडीLifestyle
July 21, 2026 03:54 PM
तुम्ही देखील स्टायलिश दिसण्यासाठी नेहमी महागडे कपडे खरेदी करता का? खरंतर नेहमीच महागडे खरेदी करण्याची गरज नसते.
ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजनाशिक
July 20, 2026 07:04 PM
Nashik Crime News : नाशिकच्या सातपूर परिसरातील परिसरातील गणेश भिका गायकवाड (Ganesh Bhika Gaikwad) या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली
ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम
July 20, 2026 05:19 PM
Dhule News : धुळे शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका लॉजवर पोलिसांची मोठी कारवाई
ताज्या घडामोडीLifestyle
July 20, 2026 03:10 PM
तुमचा ड्रेसिंग सेन्स नेहमीसारखाच वाटत असेल, तर संपूर्ण वॉर्डरोब बदलण्याची गरज नाही. योग्य अॅक्सेसरीज, स्टायलिश
ताज्या घडामोडीLifestyle
July 20, 2026 03:01 PM
बेसिक व्हाईट टी-शर्ट (Basic White T-Shirt)
https://prahaar.in/2026/07/19/want-to-look-stylish-then-definitely-try-these-trendy-skirts/
ब्लू किंवा ब्लॅक जीन्ससोबत साधा व्हाईट टी-शर्ट