मांजरीला पकडण्यासाठी बिबट्याची घरावर उडी; घराची भिंत पडली!

  74

नाशिक : बिबट्याच्या पाठलागाने घाबरून घरावर चढलेल्या मांजरीला पकडण्यासाठी बिबट्याने थेट घरावर उडी घेतली आणि या घटनेत घराची भिंत पडली. ही थरारक घटना देवळाली गावातील रोकडोबावाडी मागील भागात असलेल्या बुवा मळ्यात काल संध्याकाळी घडली.


नाशिक रोड जवळील आर्टिलरी सेंटरच्या कुंपणालगत असलेल्या या भागात गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने मळ्यातील लोकवस्ती भागातून एक मांजर उचलून नेली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा मांजरीच्या मागे लागला. जीव वाचवण्यासाठी ती मांजर भीमानाथ विश्वनाथ बुवा यांच्या पत्र्याच्या घरावर चढली.



मागे लागलेला बिबट्या थेट घरावर उडी मारून गेला. वजनदार बिबट्याच्या उडीमुळे घराची भिंत कोसळली आणि पत्र्यांचेही मोठे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील निवृत्ती बुवा, कैलास बुवा, गुड्डू बुवा आणि विश्वनाथ बुवा यांनी धाव घेतली. मानवी हालचाल पाहून बिबट्याने पुन्हा जंगलात धूम ठोकली.


बुवा मळा या भागातून मागील वर्षी जवळपास सात ते आठ बिबटे वन विभागाने जेरबंद केले होते. पुन्हा या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी, रहिवासी व त्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

Comments
Add Comment

बेस्टच्या उत्पन्नात वाढ, मात्र प्रवासी संख्येत घट

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९

आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी, पाहा कधी आहे चंद्रोदय

मुंबई: आज मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. मंगळवारी

‘दगडूशेठ हलवाई’च्या गणपतीचा प्रथमच बेल्जियममध्ये दणाणणार जयघोष

गणेशोत्सवात प्रतिकृतीची प्रतिष्ठापना; उत्सवासाठी मूर्ती सुपूर्द पुणे : ‘मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषासह

Asia Cup 2025: हार्दिक पांड्या फिटनेस टेस्ट देणार, श्रेयस अय्यरचे पुनरागमन निश्चित

नवी दिल्ली: आगामी एशिया कप २०२५ स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर सर्वांचे

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

धुक्याने माखलेल्या जंगलात शेकरूंची उधळण जुन्नर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे

Skin Care: पावसाळ्यात त्वचा आणि केसांसाठी वरदान ठरतो कडुलिंब

मुंबई: पावसाळा सुरू झाला की, वातावरणातील ओलावा आणि आर्द्रता वाढते. यामुळे त्वचे