“आगळीक केल्यास पाकिस्तानात घुसून मारू”- एस. जयशंकर

  46

नवी दिल्ली : पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची आगळीक केल्यास आम्ही पाकिस्तानात घुसून मोठा हल्ला करू असा इशारा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. जयशंकर सध्या युरोप दौऱ्यावर असून बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे जयशंकर यांनी हे वक्तव्य केलेय.

याप्रसंगी सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान हजारो दहशतवाद्यांना उघडपणे प्रशिक्षण देतो आणि त्यांना भारतात हल्ले करण्यासाठी पाठवतो. भारत यापुढे हे अजिबात सहन करणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत एस जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, जर त्यांनी एप्रिल महिन्यात केलेली क्रूर कृत्ये थांबवली नाहीत, तर त्यांना भारताकडून प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल. दहशतवादी पाकिस्तानच्या आत असतील, तर आम्ही पाकिस्तानच्या आत जाऊन हल्ला करू असा इशारा त्यांनी दिला.


पाकिस्तान हा असा देश आहे, जो दहशतवादाचा वापर साधन म्हणून करतो. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर निश्चितच पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध होऊ शकते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानी हवाई दलाचे बरेच जास्त नुकसान झाले आहे. याच कारणामुळे पाकिस्तानला भारतासमोर युद्धविरामासाठी हात जोडावे लागले. राफेल विमानांनी केलेली कारवाई किती यशस्वी झाली, याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेले हवाई तळ असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Amarnath Yatra : १ जुलैपासून अमरनाथ यात्रा मार्ग 'नो-फ्लाईंग झोन' घोषित!

श्रीनगर : अमरनाथ यात्रा येत्या ३ जुलैपासून सुरू होणार आहे. यात्रा आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक

ऑनलाईन बेटिंग प्रकरणी ईडीची नजर, अनेक बड्या लोकांची चौकशी होणार...

कोलकत्ता :  भारताचे क्रिक्रेटपटू आणि बॉलिवूड मधील मोठ्या कलाकारांवर अमलबजावणी संचालयाने (ईडी)  कारवाईला सुरवात

Bomb Threat Call: नागपूरमध्ये इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, बॉम्बच्या धमकीचा फोन

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी आल्याने एकच खळबळ नागपूर: आज मंगळवारी

Air India Plane Crash Another Video: अहमदाबाद विमान अपघातातील हृदयाचा ठोका चुकवणारा आणखीन एक व्हिडिओ आला बाहेर

बापरे! जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या  अहमदाबाद: गुजरात येथील

एअर इंडियाच्या विमानांना झालेय तरी काय? प्रवाशांचा जीव धोक्यात?

कोलकाता : एअर इंडिया कंपनीच्या बोईंग विमानांमध्ये गेल्या काही दिवसांत तांत्रिक बिघाडांची मालिकाच सुरू झाली आहे.

वृद्ध वडिलांनी मुलाला आणि सैन्यात असलेल्या पत्नीने पतीला दिला अखेरचा निरोप, दोन वैमानिक अनंतात विलीन

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात दोन मोठे अपघात झाले. एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळले. या अपघातात विमानातील