Health: वयाच्या तिशीनंतर महिलांनी खायला हवेत हे ५ ड्रायफ्रुट्स

मुंबई: वयाच्या तिशीनंतर महिलांना अधिक पोषकतत्वांची गरज असते कारण या वयानंतर त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात तसेच मेटाबॉलिज्मही कमी होते. दरम्यान, संतुलित आहाराच्या मदतीने त्या याची कमतरता भरून काढू शकतात. याच कारणामुळे अधिकतर तज्ञ महिलांना डाएटमध्ये ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात.


ड्रायफ्रुट्समध्ये अनेक पोषकतत्वे असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात. इम्युनिटी बूस्ट होते. शरीरामध्ये एनर्जी राहते. तसेच त्वचाही तुकतुकीत होते. जाणून घेऊया त्या ५ ड्रायफ्रुट्सबद्दल ज्या प्रत्येक महिलेने खाल्ल्या पाहिजेत.


मनुका


वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने आपल्या डाएटमध्ये मनुका जरूर खाल्ल्या पाहिजेत. यात अँटीऑक्सिडंट, आर्यन आणि व्हिटामिन बी मोठ्या प्रमाणात असतात यामुळे रक्त संचलन योग्य पद्धतीने होते.


अंजीर


अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. इतकंच नव्हे तर एस्ट्रोजन लेव्हल नैसर्गिकरित्या बॅलन्स होतो.


खजूर


खजूर एनर्जी आणि आर्यनचा मोठा स्त्रोत आहे. महिलांसाठी खजूर अतिशय फायदेशीर आहे. ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी खजूर खावे. यात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते यामुळे पचनास मदत होते.


बदाम


बदाममध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असते यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच हृदयाचे आजार दूर राहण्यास मदत होते. वयाच्या तिशीनंतर महिलांची हाडे कमकुवत होतात त्यामुळे त्यांनीही दररोज भिजवलेले बदाम खावेत.


अक्रोड


वयाच्या तिशीनंतर महिलांनी अक्रोडचा आपल्या डाएटमध्ये समावेश जरूर करावा. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते तसेच व्हिटामिन ई असते. हे त्वचा आणि मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या