अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला वाईट वागणूक

  66

नेवार्क विमानतळ : अमेरिकेत सरकार विरोधी आंदोलनात सहभागी झालेले अथवा या आंदोलनांना सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून पाठिंबा देणारे परदेशी विद्यार्थी यांच्या विरोधात ट्रम्प प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. तसेच शेजारी देशांतून अमेरिकेत येऊन योग्य कागदपत्रांशिवाय अथवा व्हिसाची मुदत संपूनही मुक्काम करत असलेल्या परदेशी नागरिकांच्या हकालपट्टीची मोहीम अमेरिकेने हाती घेतली आहे. अमेरिकेच्या या दोन्ही मोहिमांबाबत ट्रम्प यांच्या विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीकडे दुर्लक्ष करत ट्रम्प प्रशानाने कठोर पवित्रा स्वीकारला आहे. ताजी घटना न्यू जर्सीतील नेवार्क विमानतळावरील आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनेबाबत सविस्तर माहिती हाती आलेली नाही. पण व्हिडीओ बघून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.



नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याचे हात हातकडीने बांधले आहेत. या विद्यार्थ्याला जमिनीवर जबरदस्तीने झोपवण्यात आले. त्याची कसून अंगझडती घेण्यात आली. एकाचवेळी चार पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत आलेला तरुण विद्यार्थी पोलिसांच्या गराड्यात नेवार्क विमानतळावर होता. विद्यार्थ्याचे हात हाकड्यांमध्ये होते. पोलिसांच्या सूचनांचे तो तरुण विद्यार्थी रडत पालन करत होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच भारताच्या अमेरिकेतील वाणिज्य दूतावासाने चौकशी करुन योग्य ती कारवाई करू असे जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

Elon Musk on Trump: "मी जरा जास्तच बोललो...", एलॉन मस्कने अखेर ट्रम्प यांना म्हंटलं Sorry!

वॉशिंग्टन: गेल्या काही आठवड्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump)  आणि उद्योगपती एलॉन

ChatGPT Down : चॅटजीपीटी डाऊन, कॉपी पेस्ट करणाऱ्या लोकांची उडाली झोप!

चॅटजीपीटी (Chat Gpt) हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. लोकांनी त्याची क्षमता आजमावली आणि आता लोकांची क्रेझ

Los Angeles Protests : लॉस एंजेलिसमधील आंदोलन तीव्र, लॉस एंजेलिस का पेटतंय?

लॉस एंजेलिस : स्थलांतराच्या प्रश्नावरून लॉस एंजेलिस पेटतंय...आंदोलनांमुळे धगधगतंय. कस्टम्स एन्फोर्समेंटने

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, लॉस एंजेलिसमध्ये आणखी २ हजार नॅशनल गार्डस्‌ तैनात

ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो लॉस एंजेलिस : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड

‘मास्क घातलेल्या लोकांना अटक करा’

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या आदेशामुळे खळबळ! वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

धक्कादायक! अमेरिकेत ऑस्ट्रेलियन पत्रकारावर पोलिसांनी झाडली गोळी; लॉस एंजेलिसमधील आंदोलने हिंसक वळणावर!

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, 9News या ऑस्ट्रेलियन न्यूज