Gold Silver Rate Today: सोने सलग तिसऱ्यांदा 'स्वस्त' गुंतवणूकदारांना बंपर संधी चांदीच्या दरात वाढ कायम !

प्रतिनिधी: आजही सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या दरात किरकोळ घट झाली आहे. बाजारातील एकवेळी सोन्याची संदिग्धता कायम असताना बाजारातील सोन्याच्या दरात आज घट कायम राहिली आहे. सलग चार वेळा सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज तिसऱ्यांदा घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिका व चीनची व्यापारावर सकारात्मक चर्चा व पुरवठ्यातील सरलता,घटलेली मागणी वाढता पुरवठा यामुळे सोन्याच्या दरात घट घडून येत आहे. आंतरराष्ट्रीय दबाव कायम असतानाही भारतीय सराफा बाजारात सोन्याने आजही खालची पातळी राखली आहे. 'गुड रिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमतीत ११ रूपयांची घट होऊन दर ९७५८ रूपयांना पोहोचले आहेत. तर प्रति तोळा किंमत ९७५८० रूपये आहे.

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोने किंमत १० रूपयांनी घसरून ८९४५ रुपये झाले आहे.तर प्रति तोळा किंमत ८९४५० रूपयांवर पोहोचले आहेत. १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८ रुपयांनी घट होत किंमत ७३१९ रुपयांवर पोहोचली आहे. तर प्रति तोळा किंमत ७३१९० रुपयांवर पोहोचली आहे. बडोदा व अहमदाबाद या शहरातील २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९७६३ रूपये वगळता मुंबईसह इतर प्रमुख शहरांत सोने प्रति ग्रॅम ९७५८ रूपये आकारले जात आहे. काल सोन्यात २८ रूपयांनी घट झाली होती. त्यामुळे सोने गुंतवणूकीत सर्वसामान्यांना सुवर्णसंधी असल्याचे मानले जात आहे.

एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) वरील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. सोने निर्देशांक ०.६५% घसरून दर पातळी ९६५३८.०० रूपये आहे. रॉयटर्सच्या ताज्या कमोडिटी अहवालानुसार,०५०२ जीएमटी वेळेपर्यंत (Greenwhich MeanTime) भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजेपर्यंत स्पॉट गोल्ड ०.६% घसरून ३,३०७.७२ $ प्रति औंसवर आला होता. अमेरिकन सोन्याचा वायदा ०.८% घसरून $३,३२७.५० वर आला. दुपारपर्यंत गोल्ड फ्युचर (Gold Future) निर्देशांकात ०.१२ टक्क्याने घसरण झाली होती. यावरून सोन्याच्या दरात घसरण चालूच आहे. मंगळवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली, कारण अमेरिकन डॉलरमध्ये वाढ झाल्याने बाजारातील सहभागी लंडनमध्ये अमेरिका आणि चीनमधील व्यापार चर्चेच्या दुसऱ्या दिवसाच्या तपशीलांची वाट पाहत होते. भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याचे आकर्षण वाढते आणि व्याजदर कमी असताना सोन्याच्या दरात अधिक हालचाली होतात.

चांदीच्या दरात मात्र सलग दुसऱ्यांदा वाढ कायम !

चांदीच्या दरात आज प्रति ग्रॅम किंमत १ रूपयाने वाढत १०९ रूपये दरावर पोहोचली आहे तर प्रति किलो चांदी १०९००० रूपयांवर पोहोचली आहे. यामुळे प्रति किलो चांदीचा भाव तब्बल १००० रुपयाने वाढला आहे. चांदीच्या एमसीएक्सवरील निर्देशांकात ०.४२ % घसरण होत किंमत पातळी १०६६३५.०० आहे. स्पॉट सिल्व्हर ०.५% घसरून $३६.५२ प्रति औंसवर आला आहे. विशेषतः चांदीच्या दरात प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची कमकुवत किंमत,वाढलेला भू-राजकीय तणाव आणि ईव्हीआणि सौर क्षेत्रांकडून मजबूत औद्योगिक मागणी यामुळे आणखी वाढ अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

Malegaon Mayor Election 2026 : मोठी बातमी! मालेगावमध्ये महापौरपदाची निवडणूक संपताच धक्कादायक घटना, महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली अन् थेट...

नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच

मेटाची अँटी स्कॅम मोहीम

मुंबई : 'मेटा अँटी-स्कॅम' (Meta Anti-Scam) हा मेटा कंपनीचा (Facebook, WhatsApp, Instagram) ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून

Ladki Bahin Yojana e-KYC: बहिणींसाठी आनंदवार्ता! 'या' दिवसापर्यंत आता करता येणार ई-केवायसी

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु