Audi India: ऑडी इंडियाकडून 'ऑडी ए४ सिग्‍नेचर' एडिशन लाँच

प्रतिनिधी: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज ऑडी ए४ सिग्‍नेचर एडिशनच्‍या लाँचची घोषणा केली. या कारमध्‍ये विशेष डिझाइन घटक आहेत जे प्रीमियम कारची अनुभूती देऊन आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतात असा कंपनीचा दावा आहे.


सिग्‍नेचर एडिशनमध्‍ये विशिष्‍ट स्‍टायलिंग सुधारणांसह आकर्षक ऑडी रिंग्‍स एण्‍ट्री एलईडी लॅम्‍प्‍स,विशेष ऑडी रिंग्‍स डेकल्‍स आणि डायनॅमिक व्‍हील हब कॅप्‍स आहेत जे आकर्षक व्हिज्‍युअल उपस्थिती निर्माण करतात. या सिग्‍नेचर एडिशनमध्‍ये लक्‍झरी सेदानमध्‍ये व्‍यक्तिमत्त्व व विशिष्‍टतेचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांसाठी प्रीमियम वैशिष्‍ट्यांसह सुधारित इकोसिस्टिम आहे.


किंमतीच्या बाबतीत बोलयाचे तर या ऑडी ए४ सिग्‍नेचर एडिशन कारची किंमत ५७,११,००० रूपयांपासून (एक्‍स-शोरूम) सुरू होते. ऑडी ए४ सिग्‍नेचर एडिशन मर्यादित युनिट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. ही कार ग्‍लेशियर व्‍हाइट मेटलिक, मिथोस ब्‍लॅक मेटलिक, नवेरा ब्‍ल्‍यू मेटलिक, प्रोग्रेसिव्‍ह रेड मेटलिक आणि मॅनहॅटन ग्रे मेटलिक या पाच आकर्षक रंगांमध्‍ये येते. ऑडी ए४ सिग्‍नेचर एडिशन फक्‍त टेक्‍नॉलॉजी व्‍हेरिएण्‍टसह उपलब्‍ध आहे आणि सिग्‍नेचर एडिशनची विशेष वैशिष्‍ट्ये ऑडी जेन्‍यूएन ॲक्‍सेसरीजचा भाग आहेत. याविषयी प्रतिक्रिया देताना ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, 'ऑडी ए४ आमच्‍या लाइन-अपमधील सर्वाधिक विक्री होणारी सेदान कार आहे. या कारमध्‍ये गतीशीलता, कार्यक्षमता आणि अत्‍याधुनिक आकर्षकतेचे संयोजन (Blend) आहे.सिग्‍नेचर एडिशनच्‍या लाँचसह आम्‍ही ग्राहकांना अधिक विशेष व्‍हेरिएण्‍टचे मालक बनण्‍याची संधी देत आहोत, जेथे या कारमध्‍ये बीस्‍पोक स्‍टायलिंग घटक आहेत, जे तिच्‍या प्रीमियम अपीलमध्‍ये अधिक वाढ करतात. ऑडी ए४ सिग्‍नेचर एडिशन सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जे सुधारित आकर्षकतेला महत्त्व देतात आणि त्‍यांच्‍या निवडलेल्‍या वेईकलच्‍या माध्‍यमातून अत्‍याधुनिक स्‍टेटमेंट दर्शवतात.'


सिग्‍नेचर एडिशनची वैशिष्‍ट्ये:


सिग्‍नेचर एडिशन पॅकेज ऑडी ए४ साठी बीस्‍पोक स्‍टायलिंग सुधारणा देते. हे विशेष पॅकेज पुढील वैशिष्‍ट्यांसह विशिष्‍ट लुक देते


पार्क असिस्‍टसह ३६०-डिग्री कॅमेरा (नवीन)


वूड ओक, नॅचरल ग्रेमध्‍ये नवीन डेकोरेटिव्‍ह इनलेज (नवीन)


ऑडी रिंग्‍स एण्‍ट्री एलईडी लॅम्‍प्‍स, जे आकर्षक वेलकम लाइट प्रोजेक्‍शनची निर्मिती करतात (नवीन)


सुधारित ब्रँड उपस्थितीसाठी विशिष्‍ट ऑडी रिंग्‍ज डेकल्‍स (नवीन)


डायनॅमिक व्‍हील हब कॅप्‍स, जे चाक गतीमध्ये असताना देखील ऑडी लोगो ओरिएन्‍शन परिपूर्ण ठेवतात (नवीन)


उत्‍साहवर्धक केबिन वातावरणासाठी प्रीमियम फ्रॅग्रॅनन्‍स डिस्‍पेन्‍सर (नवीन)


अधिक गतीशील प्रोफाइलसाठी ऐरोडायनॅमिक स्‍पॉयलर लिप (नवीन)


वेईकल ॲक्‍सेसमध्‍ये प्रीमियम लुकसाठी कस्‍टमायझेबल कलर पर्यायांमध्‍ये की कव्‍हर (नवीन)


स्‍टेनलेस स्‍टील पेडल कव्‍हर्स स्‍पोर्टी इंटेरिअर असेंटची भर करतात (नवीन)


आकर्षक लुकसाठी विशेष अलॉई व्‍हील पेंट डिझाइन (नवीन)


ऑडी ए४ ची अतिरिक्त वैशिष्‍ट्ये:


२.० लिटर टीएफएसआय इंजिनची शक्‍ती, जे २०४ एचपी (१५० केडब्‍ल्‍यू) शक्‍ती आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते


कार फक्‍त ७.१ सेकंदांमध्‍ये थांबलेल्‍या स्थितीपासून १०० किमी/तास गती प्राप्‍त करू शकते आणि २४१ किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करू शकते


१२ व्‍होल्‍ट मिड हायब्रिड सिस्‍टम इंधन वापर कमी करते, तर आरामदायीपणा वाढवते


ब्रेक रिकपरेशन एकूण इंधन कार्यक्षमता वाढवते


बीअँडओ प्रीमियम साऊंड सिस्‍टमसह ३डी साऊंड - तसेच १९ स्‍पीकर्ससह सेंटर स्‍पीकर व सबवूफर, १६-चॅनेल अॅम्प्लिफायर आणि ७५५ वॅटचे आऊटपुट


३-स्‍पोक, फ्लॅट बॉटम, स्‍पोर्टस् कॉन्‍चर लेदरमध्‍ये रॅप केलेले मल्‍टी-फंक्‍शन प्‍लस स्‍टीअरिंग व्‍हील


आकर्षक स्‍टायलिश इंटीरिअर सुस्‍पष्‍ट होरिझोण्‍टल लाइन्‍समधून दिसून येते


कंट्रोल सेंटरमधील एमएमआय टच डिस्‍प्‍लेमध्‍ये अकॉस्टिक फिडबॅक असण्‍यासोबत २५.६५ सेमीचा हाय-रिझॉल्‍यूशन टीएफटी डिस्‍प्‍ले आहे


ऑडी स्‍मार्टफोन इंटरफेस.


नॅचरल-लँग्‍वेज वॉइस कंट्रोल प्रत्‍येक संभाषणामध्‍ये वापरण्‍यात येणाऱ्या वाक्‍यांना समजते


एमएमआय नेव्हिगेशन प्‍लसमध्‍ये ऑल-डिजिटल व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस आहे आणि मल्‍टीफंक्‍शन स्‍टीअरिंग व्‍हीलचा वापर करत नियंत्रित केले जाते


ॲम्बियण्‍ट लायटिंग पॅकेज प्‍लस ३० रंगांच्‍या पर्यायांसह इंटीरिअरमध्‍ये आकर्षकतेची भर करते


कम्‍फर्ट की अधिक सोयीसुविधोसाठी कीलेस प्रवेश आणि गेस्‍चर-आधारित बूट लिड ओपनिंग देते


स्‍मार्टफोनसाठी ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग


वूड ओकमधील डेकोरटिव्‍ह इनलेजसह लेदर व लेदरेट अपहोल्‍स्‍टरी प्रीमियम केबिनमध्‍ये टोन सेट करते


पार्क असिस्‍टसह ३६०-डिग्री कॅमेरा विनासायास पार्किंग सुविधा देतो


पॉवर्ड फ्रण्‍ट सीट्ससह ड्रायव्‍हर सीटसाठी मेमरी वैशिष्‍ट्य


थ्री-झोन क्‍लायमेट कंट्रोल


Comments
Add Comment

दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट! दहशतवादी कटाचा संशय; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) सोमवारी सायंकाळी एका मोठ्या स्फोटाने हादरली. येथील ऐतिहासिक लाल किल्ला

क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश

महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून

जम्मू-काश्मीरमध्ये २,९०० किलो स्फोटके जप्त!

दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश: दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराज्यीय व

Audi India: लक्झरी कारमेकर ऑडीकडून तीन सिग्नेचर Audi Q3,Audi Q5 कार भारतात दाखल

(Audi Q3) ऑडी क्यू३ सिग्नेचर लाइन आणि क्यू३ स्पोर्टबॅकमध्ये पार्क असिस्ट प्लस, १२-व्ही आउटलेट आणि मागील डब्यात २

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा