पूरस्थिती रोखण्यासाठी वाहनांवर दहा पंपांची व्यवस्था

पुढील चार वर्षांकरिता केली पालिकेने सोय


मुंबई (खास प्रतिनिधी): सखल भागामध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा लवकर व्हावा, यासाठी महानगरपालिकेतर्फे उदंचन संच बसविण्यात येतात. मात्र, विविध कारणांमुळे हे उदंचन पंप कार्यान्वित न झाल्यास सखल भागामध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे पर्जन्य जलवाहिन्या विभागाने उदंचन पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून वाहनावर आरूढ १० फिरते उदंचन संच उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सन २०२५, २०२६, २०२७ आणि २०२८ या चार वर्षांसाठी भाडेतत्वावर वाहनावर आरूढ फिरते उदंचन संच घेतले जाणार आहेत. या वाहनात २ पंप बसवण्यात आले असून, प्रत्येक पंपाची क्षमता २५० घनमीटर प्रति तास इतकी आहे.



गेल्या काही वर्षात वातावरणीय बदलांमुळे पर्जन्यमानावर परिणाम झाला आहे. हे आता ठळकपणे दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षात मुंबईतील काही ठराविक भागात कमी कालावधीत २५० ते ३०० मिलीमीटर पाऊस कोसळल्याची नोंद आहे. यंदा तर मे महिन्यातच पावसाचे आगमन होत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईची भौगोलिक रचना विचारात घेऊन महानगरपालिका दरवर्षी पूर व्यवस्थापन उपाययोजना करते. त्यात कमीत कमी वेळेत पावसाळी पाण्याचा निचरा व्हावा आणि मुंबईकर नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेतली जाते.


पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे दरवर्षी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. त्यात सखल भागांमध्ये ५१४ ठिकाणी पाणी उपसा करणारे उदंचन संच तैनात केल्याचा समावेश आहे. हे उदंचन पंप पावसाळ्यात बंद पडता कामा नये. उदंचन पंपांची यंत्रणा व पर्यायी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहिली पाहिजे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.


प्रत्येक वाहनावर २ पंप बसविण्यात येणार असून, प्रत्येक पंपाची क्षमता २५० घनमीटर प्रति तास इतकी आहे. या उपाययोजनेंतर्गत वाहन आरूढ फिरत्या उदंचन संचांची तात्काळ उपलब्धता सुनिश्चित होऊन उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर वेळीच उपाय करणे शक्य होणार आहे. तातडीच्या प्रसंगी या पर्यायी व्यवस्थेचा प्रतिसाद कालावधी कमी असला पाहिजे. जेणेकरून फिरते उदंचन संच तातडीने घटनास्थळी पोहचवता आले पाहिजेत. या वाहनांवर तीन सत्रांमध्ये म्हणजे २४ तास मनुष्यबळ उपलब्ध हवे, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर