केरळात कोरोना पाठोपाठ आता हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढ

  63

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच आता केरळमध्ये हेपेटायटीस या प्राणघातक प्रादुर्भावामुळे चिंता वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम त्रिशूर जिल्ह्यात दिसून येत आहे, तिथे हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य विभागाने याबाबत लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.


त्रिसूर जिल्ह्यात हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यानंतर प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत लोकांना सूचना दिल्या आहेत. फक्त उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी पिण्यास सांगितले आहे. शिळे अन्न खाणे टाळा. विशेषतः हॉटेल्स आणि ढाब्यांना स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स आणि ढाब्यांना पिण्याचे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतरच द्यावे आणि गरम पाण्यात थंड पाणी मिसळू नये असे सांगण्यात आले आहे.



केरळमध्ये या संसर्गामागील मुख्य कारण हेपेटायटीस ए आणि ई विषाणू आहे, जो दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. पावसाळा सुरू होणार आहे आणि या काळात रोग पसरण्याचा धोका आणखी वाढतो. हेपेटायटीसचा संसर्ग शरीरात प्रवेश केल्यानंतर, त्याची लक्षणे दिसण्यास १५ ते ६० दिवस लागू शकतात.ताप आणि शरीरदुखी, थकवा आणि अशक्तपणा, डोकेदुखी आणि मळमळ, डोळे आणि त्वचा पिवळी पडणे, लघवी काळी पडणे. अतिसार जर यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. स्वतःहून औषधे घेणे टाळा.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये