अभिनेत्री जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा

मुंबई : नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून अनेक स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात. अशातच महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख याची बायको जिनिलियानेही आज(दि.१०) वटपौर्णिमा साजरी केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


जिनिलिया देशमुखने घरातच आणलेल्या वडाच्या रोपट्याची पूजा केली. देवघरासमोरच ही पूजा मांडली होती. जिनिलियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता ज्यात ती सुंदर दिसत होती. 'प्रिय नवरा...आय लव्ह यू, बस... वटपौर्णिमा' असं तिने व्हिडिओ शेअर करत लिहिले.


 


जिनिलिया देशमुख कुटुंबात अगदी आनंदाने सर्व सण, रुढी परंपरा पाळताना दिसते. म्हणूनच तिला महाराष्ट्राची लाडकी वहिनीही म्हटलं जातं. रितेश आणि जिनिलियाच्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत. त्याआधी ते १० वर्ष एकमेकांना डेट करत होते. सर्वांसाठी दोघंही आदर्श कपल आहे. त्यांना राहील आणि रियान ही दोन मुलं आहेत.


जिनिलिया आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. आमिर खानसोबत तिची जोडी जमली आहे. त्यांची केमिस्ट्रीवर प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर दुसरीकडे रितेश देशमुख नुकताच 'हाऊसफुल ५' सिनेमात दिसला. सध्या तो 'राजा शिवाजी' सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. जिनिलिया सिनेमाची निर्मिती करत आहे.

Comments
Add Comment

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

नवी दिल्ली: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल त्यांच्या सिने कारकीर्दीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल २०२३ चा प्रतिष्ठित

'कल्की 2898 AD' मधून काढल्यानंतर दीपिकाची भावनिक पोस्ट !

मुंबई : दीपिका पादुकोण सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अलीकडेच तिला प्रभासच्या 'कल्की 2898 AD' या चित्रपटाच्या

बॉलिवूड अभिनेता संजय मिश्राने खरेदी केली आलिशान सीफेस अपार्टमेंट: किंमत ऐकून व्हाल थक्क !

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय मिश्राने मढ येथे एक महागडे सीफेस अपार्टमेंट खरेदी केली आहे. मढ परिसर चित्रपटांच्या

आणि रंगमंचावर अवतरल्या ‘त्या तिघी’

आणि रंगमंचावर अवतरल्या ‘त्या तिघी’ राज चिंचणकर यंदा पावसाने मुंबईत बराच धुमाकूळ घातला आणि त्याचा परिणाम

‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण

‘आतली बातमी फुटली’द्वारे मराठीत पदार्पण युवराज अवसरमल आतली बातमी फुटली’ हा नवीन चित्रपट आलेला आहे. या

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या