Team India : भारतीय संघाच्या वेळापत्रकात बीसीसीआयने केला मोठा फेरबदल

मुंबई: भारतीय संघ या वर्षी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानप करत आहे. याच्या वेळापत्रकात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही फेरबदल केले आहेत. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद करणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा सामना १० ऑक्टोबरला कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्समध्ये होणरा होता मात्र नव्या वेळापत्रकानुसार हा सामना नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाईल. त्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरला नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता मात्र आता हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर शिफ्ट करण्यात आला आहे. बाकीच्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही.

वेस्ट इंडिजचा भारत दौरा


पहिली कसोटी - २ ते ६ ऑक्टोबर, अहमदाबाद
दुसरी कसोटी - १० ते १४ ऑक्टोबर, नवी दिल्ली

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा


पहिली कसोटी - १४ ते १८ नोव्हेंबर, कोलकाता
दुसरी कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर, गुवाहाटी
पहिली वनडे - ३० नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे - ३ डिसेंबर, रायपूर
तिसरी वनडे - ६ डिसेंबर, विशाखापट्टणम
पहिला टी-२० - ९ डिसेंबर , कटक
दुसरा टी-२० - ११ डिसेंबर, मुल्लांपूर
तिसरा टी-२० - १४ डिसेंबर, धरमशाला
चौथा टी-२० - १७ डिसेंबर, लखनऊ
पाचवा टी-२० - १९ डिसेंबर, अहमदाबाद
Comments
Add Comment

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ