रेपो दरात झालेली कपात, आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मकता, घरगुती गुंतवणूकदारांनी दिलेला मोठा प्रतिसाद यामुळे आज सेन्सेक्स निफ्टी समाधानकारक आकड्यांवर पोहोचले. सेन्सेक्स बँक निर्देशांक ४३९.२५ अंशाने वाढत ६३९९५.६१ पातळीवर तर निफ्टी २६१.२० अंशाने वाढत ५६८३९.६० पातळीवर बंद झाला. ही मोठी गरूडझेप होती. बीएसई व एनएसई मिडकॅप चांगली वाढ झाली होती. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०३% व १.१९ टक्क्याने वाढ झाली तर एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.४७% व १.५७% ने वाढ झाली आहे.
आज बीएसईवर ४३३५ पैकी २७९८ समभागात वाढ झाली तर १४०९ समभागात घसरण झाली आहे. एनएसईत ३०५५ पैकी २०६६ समभाग तेजीत तर ९०४ समभागात अखेर घट झाली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये सर्वाधिक वाढ बँक, आयटी, तेल व गॅस निर्देशांकात झाली आहे. बँक निर्देशांकात (०.४६%), आयटी (१.०%), खाजगी बँक (१.०३%), पीएसयु बँक (१.५२%), तेल व गॅस (१.०४%)समभागात झाली आहे. आज अखेरीस रिअल्टी समभागांचा अश्वमेध रथ बाजाराने रोखला आहे. मिडिया समभागात शुक्रवारी घट झाली असताना आज मात्र ०.४३% वाढ झाली आहे. निफ्टी मिड कॅप आयटी व टेलिकॉममध्ये १.६७% आज वाढ झाली आहे.
आज सत्राअखेरीस बीएसई व एनएसई सर्वाधिक वाढ कॅप्रिग्लोबल (१९.५२%), वेस्टलाईफ फूड (९.८१%), जेएम फायनांशियल (८.८७%), आयआयएफएल फायनान्स (८.०५%), जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट (८.८५%),जिओ फायनांशियल सर्विसेस (३.४९%), कोटक महिंद्रा बँक (३.१३%), बजाज फायनान्स (२.५२%), एक्सिस बँक (२.५२%), हिरो मोटोकार्प (१.९१%), अदानी एंटरप्राईजेस (१.८९%), श्रीराम फायनान्स (१.४२%), एनटीपीसी (१.२८%), ओएनजीसी (१.१४%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण कोचीन शिपयार्ड (३.७८%), डेटा पॅटर्न (३.४८%), स्विगी (२.६३%), इटर्नल (१.९२%), आयसीआयसीआय बँक (१.७१%), अपोलो टयुब (२.०२%), कल्याण ज्वेलर्स (२.०१%), अदानी पोर्टस (०.३१%) या समभागांना झाले आहे.
याशिवाय रॅपिडोने रेस्टॉरंटवर कमी केलेल्या कमिशनचा फटका झोमॅटो व स्विगीला बसला होता. झोमॅटो (Eternal १.९२%) घसरण झाला असून स्विगीचे समभाग (२.७९%) ने घसरले आहेत. याशिवाय सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीमधील वाढीनंतर बाजाराने मोठा परिणामकारक बदल घडवला.कॅप्रीग्लोबल कंपनीच्या समभागातही अखेरच्या टप्प्यात थेट १९.५२% वाढला आहे. कंपनीने ऑटोमॅटिक ईएमआय पेरोलची सुविधा केल्यानंतर समभागाने उसळी घेतली आहे. दिवसभरात बीएसईवर १,९८६.६० रुपयांचा नवीन उच्चांक गाठल्यानंतर, ह्युंदाई मोटर इंडियाचे शेअर्स ४.८% वाढून दिवसभरात वधारले आहेत.
गेल्या शुक्रवारी निफ्टी निर्देशांक दोन आठवड्यांच्या उच्चांकावर आणि २५,००० च्या वर बंद झाला होता, त्यामुळे निफ्टी देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर डेटा-हेवी (महत्वाच्या) आठवड्यात प्रवेश करत आहे. योगायोगाने, ही तीच पातळी आहे जिथे निर्देशांक २६ मे रोजी बंद झाला होता परंतु त्या पातळींपेक्षा जास्त टिकून राहण्यात आणि ५००-अंकांच्या एकत्रीकरण श्रेणीत जाण्यात अपयशी ठरला होता. पुन्हा हीच परिस्थिती बाजारात पहायला मिळाली आहे.
आजच्या बाजारातील वाढीचे मुख्य कारण म्हणजे शुक्रवारी आरबीआयने अपेक्षेपेक्षा जास्त ५० बेसिस पॉइंट रेपो दर कपात आणि १०० बेसिस पॉइंट सीआरआर कपात जाहीर केल्यानंतर ही तेजी आली. हे कपातीचे उद्दिष्ट क्रेडिट ग्रोथला पुनरुज्जीवित करणे आणि बँक मार्जिनसह अर्थव्यवस्थेतील वाढीला व चलनतेला चालना देणे होते. त्याचाच परिपाक म्हणून बाजारात बँक निर्देशांकाने उसळी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीतही उसळी कायम होती. अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्समध्ये ०.०९ टक्क्याने वाढ झाली होती. आर्थिक क्षेत्राबाहेर, वीज डेरिव्हेटिव लाँच करण्यासाठी नियामक मंजुरी मिळाल्यानंतर एमसीएक्सने ७% वाढ नोंदवली आहे. ही उर्जा क्षेत्रात मोठी क्रांती करु शकेल अशी आशा सर्वांना आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दृष्टीने आजचा दिवस हा देखील एक महत्त्वाचा दिवस आहे कारण अमेरिका आणि चीनचे प्रतिनिधी त्यांच्या व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी लंडनमध्ये जमले असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. या आठवड्यात भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये चलनवाढीचा डेटा जाहीर केला जाणार आहे. त्यासंबंधी मध्यवर्ती बँकांना चलनविषयक धोरणासाठी पुढील संकेत देऊ शकेल ज्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम बाजारावर जाणवू शकतो. आज सोन्याच्या दरात घसरण झाली असताना डॉलरच्या तुलनेत रुपयाची देखील घसरण झाली. ज्याचा परिमाम अमेरिकन बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर जाणवला आज एकूणच परिस्थिती पाहता उद्याही बँक निर्देशांक, आयटी, फायनांशियल सर्विसेस, रिअल्टी समभागांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, ' आजचा दिवस बाजार सकारात्मक बंद होण्यास सर्वच कंपन्यांचा हातभार दिसत आहे.बॅक,बजाज फायनान्स,बजाज फिनसर्व्ह,स्टेट बॅंक या सर्व बरोबर साफ्टवेयर टेक्नालॉजी, ईनफी,एचसीएल या सर्वाच्या जोरावर आज बाजार सेन्सेक्स २५६ ने वर गेला ही बाब खुप महत्वपूर्ण आहे. बाजाराने व्याज दरातील कपात,व सीआरआर कमी करून मनी मार्केटला खुप मोठी भेट दिली त्याचे परिणाम हळूहळू दिसत राहिले तर तेजीची सुरवात नक्कीच जवळपास दिसेल.हळूहळू विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी थोडी थोडी दिसतेय.'
आजच्या सत्राअखेरीस प्रतिक्रिया देताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी सलग चौथ्या सत्रातही तेजीचा वेग कायम ठेवला, अनुकूल जागतिक संकेत आणि सहाय्यक देशांतर्गत चलनविषयक निर्णयांमुळे तेजी आली. निफ्टी ५० हा निर्देशांक सकारात्मक पातळीवर उघडला आणि सत्राच्या बहुतेक काळात मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होता आणि नंतर १००.१५ अंकांनी किंवा ०.४०% ने वाढून २५,१०३.२० वर बंद झाला. गुंतवणूकदारांच्या भावना सर्वत्र उत्साही राहिल्या, निफ्टी रिअल्टी निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले, ज्यामध्ये किरकोळ तोटा झाला. निफ्टी आयटी, निफ्टी मीडिया आणि निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक आघाडीवर होते, जे या विभागांमध्ये मजबूत मागणी दर्शवितात. व्यापक बाजाराने बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा व्यापक सहभाग दिसून आला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक १.२% ने वाढला, तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक १.६% ने वाढला, जो फ्रंटलाइन स्टॉकच्या पलीकडे मजबूत खरेदीची आवड दर्शवितो.
बँकिंग स्टॉक सत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे होते, बँक निफ्टी निर्देशांकाने त्याची तेजी नवीन सार्वकालिक उच्चांक गाठण्यासाठी वाढवली. रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये अचानक ५० बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर आणि कॅश रिझर्व्ह रेशोने (CRR) मध्ये एकाच वेळी कपात केल्यानंतर बाजारातील आशावाद अधोरेखित करणारा हा निर्देशांक पहिल्यांदाच ५७,००० चा टप्पा ओलांडला. या अनपेक्षित आर्थिक सवलतीच्या उपायांमुळे बँकिंग क्षेत्रातील आत्मविश्वास वाढला, ज्यामुळे PSU आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये तीव्र तेजी आली. सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँकिंग समभागांमध्ये झालेल्या दुहेरी वाढीमुळे गुंतवणूकदारांना कर्ज वाढ, तरलता वाढ आणि भविष्यात मजबूत कमाईची अपेक्षा असल्याचे दिसून येते. एकूणच, सोमवारच्या सत्रात व्यापक सहभागासह एक मजबूत, भावनाचलित तेजी दिसून आली, जी पुढील आठवड्यासाठी सकारात्मक सूर निर्माण करते.'
निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'निर्देशांकाने एक लहान बेअर कॅन्डल तयार केली आहे ज्यामध्ये उच्च आणि उच्च कमी आहेत आणि त्याच्या बेसच्या खाली एक तेजीची अंतर आहे (२५०२९-२५०७७) जो सकारात्मक पूर्वाग्रह आणि वरच्या हालचाली सुरू ठेवण्याचे संकेत देतो. निर्देशांक गेल्या तीन आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणी २४,४००-२५,१०० च्या वरच्या बँडच्या वर ब्रेक होत असल्याचे दिसून येत आहे.आम्हाला विश्वास आहे की रचना सकारात्मक राहील आणि निर्देशांक २५,२५० च्या तात्काळ अडथळ्याकडे आणि नंतर येत्या आठवड्यात २५,५०० च्या दिशेने जाईल. येत्या सत्रांमध्ये होणारी घसरण खरेदीची संधी म्हणून वापरली पाहिजे आणि २४,९००-२५,००० पातळीवर तात्काळ अल्पकालीन आधार हा अलिकडचा ब्रेकआउट क्षेत्र आहे. २४,६००-२४,७०० हा शुक्रवारच्या नीचांकी आणि २० दिवसांच्या EMA च्या संगमामुळे प्रमुख आधार क्षेत्र आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टी बँक निर्देशांकावर प्रतिक्रिया देताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांकाने एक लहान बेअर कॅन्डल तयार केली ज्यामध्ये उच्च आणि उच्च कमी पातळी होती आणि त्याच्या बेसच्या खाली एक तेजीची अंतर (५६६९५-५६७९२) होती जी सकारात्मक पूर्वाग्रह आणि गेल्या ६ आठवड्यांच्या श्रेणीतील (५६,०००-५३,५००) वरच्या बँडच्या वर ब्रेकिंगनंतर अप मूव्ह सुरू राहिल्याचे संकेत देते. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक सकारात्मक पूर्वाग्रह राखेल आणि नजीकच्या काळात ५७,३०० आणि ५७,७०० पातळींकडे जाईल. निफ्टीची अल्पकालीन रचना तत्काळ आधारासह राहते कारण शुक्रवारचा ब्रेकआउट क्षेत्रात निर्देशांकाने ५५,९०० पातळींवर तात्काळ आधार ठेवला आहे. तर प्रमुख आधार ५५,४००-५५,५०० पातळींवर आहे जो २० दिवसांच्या EMA आणि प्रमुख रिट्रेसमेंट क्षेत्राचा संगम आहे.'