Indore Missing Couple चा अखेर खुलासा झालाच! 'या' कारणामुळे सोनमनेच दिली होती पती राजाला मारण्याची सुपारी

शिलाँग: मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले इंदूरचे दाम्पत्य बेपत्ता झाल्याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहे.  पत्नी सोनम हिनेच पती राजा रघुवंशीला मारण्याची सुपारी मध्य प्रदेशातील तिघा जणांना दिली होती. या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाहा याचा देखील समावेश होता, या सर्व आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि भाड्याने घेतलेल्या मारेकऱ्यांसह तिच्या पती राजाला मारण्याचे कंत्राट दिले होते. सोनमचे लग्नापूर्वी राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते आणि तोच या हत्येचा सूत्रधार आहे.



लग्नापूर्वी सोनमचे राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध


लग्नापूर्वी सोनमचे राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते आणि तोच या हत्येचा सूत्रधार आहे. प्रकरणाच्या तपासात असे दिसून आले की सोनमच्या वडिलांचा इंदूरमध्ये एक छोटा प्लायवूड कारखाना आहे, जिथे राज कुशवाहा काम करत होता. सोनम अनेकदा कारखान्याच्या ऑफिसमध्ये येत असे आणि इथेच दोघांमध्ये प्रेम झाले. राज कुशवाहा सोनमपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रेमसंबंधामुळे सोनमने राजसोबत मिळून राजाला मारण्याचा कट रचला.



जाणून घ्या पूर्ण घटनाक्रम


इंदूरचा रहवासी राजा रघुवंशी हा वाहतूक व्यावसायिक होता, ज्याचे सोनम सोबत ११ मे रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झाले. लग्नाच्या नऊ दिवसांनी, २० मे रोजी, हे जोडपे हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले. २२ मे रोजी ते भाड्याने घेतलेल्या स्कूटरवरून मावलाखियात गावात पोहोचले आणि नोंगरियात गावातील 'लिव्हिंग रूट्स' पूल पाहण्यास गेले.  त्यानंतर या जोडप्याने नोंगरियातमधील शिप्रा होमस्टे येथे रात्र घालवली आणि २३ मे रोजी सकाळी चेक आउट केले. त्यानंतर मात्र दोघेही बेपत्ता झाले. दिनांक २४ मे रोजी शिलाँग-सोहरा रस्त्यावरील सोहरारीम येथील एका कॅफेबाहेर त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर सोडून दिलेली आढळली. त्यानंतर दि. २ जून रोजी राजाचा कुजलेला मृतदेह वेइसावडोंग धबधब्याजवळील खोल खड्ड्यात आढळला.  त्यानंतर सोनमचा मात्र काहीच पत्ता पोलिसांना लागत नव्हता. मात्र, आज ९ जून रोजी सोनम गाजीपूरमध्ये आढळली. आणि त्यानंतर या प्रकरणाचा पुरता खुलासा झाला.  

Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची